Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

महाराष्ट्रात १७ ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज?

Spread the love
FacebookTwitterGmailInstagramWhatsapp

मुंबई | बंगालच्या उपसागरात निर्माण झालेला कमी दाबाचा पट्टा अधिक खोलवर गेल्याने त्याची दिशा पश्चिम-वायव्य अशी राहील. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात १७ ऑक्टोबरपर्यंत मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ तसेच कोकणात बऱ्याच ठिकाणी येत्या चार-पाच दिवसांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. हवामान विभागाच्या अधिकारी शुभांगी भुते यांनी ही माहिती दिली.

https://twitter.com/Hosalikar_KS/status/1315198384752390149?s=20

११ ते १७ ऑक्टोबर या काळात महाराष्ट्रात कोकणासह आतल्या भागात पाऊस सक्रिय राहण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. ढगांच्या गडगडाटासह जोरदार वारे वाहतील. कापणीला आलेल्या पिकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे, असा इशारा मुंबईच्या हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर यांनी दिला आहे. पुणे शहर आणि परिसरात दिवसभर ढगाळ वातावरण होते, सकाळपासून सूर्यदर्शन झाले नाही. काल रात्री शहरात सर्वत्र मुसळधार पाऊस बरसला. आज दिवसभर वातवारण ढगाळ होते, काही ठिकाणी पाऊस झाला.

FacebookTwitterWhatsAppShare
GmailLinkedinFacebookTwitterWhatsapp
Exit mobile version