Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

कोव्हिशिल्ड’ लसीचे सीरम इन्स्टिट्यूटमधून लसीचे 3 ट्रक रवाना!

पुणे :- कोरोनावरील ‘कोव्हिशिल्ड’ लसीचे वितरण आज पहाटे पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून सुरु झाले. लस घेऊन जाणारे तीन ट्रक आज पहाटे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले आणि तेथून लस पोलिस बंदोबस्तात देशातील १३ ठिकाणी रवाना करण्यात आली. पुण्याच्या डीसीपी नम्रता पाटील यांच्या हस्ते नारळ फोडून या लस घेऊन जाणाऱ्या वाहनांना मार्गस्थ करण्यात आले. लसीची पहिली खेप सीरम इन्स्टिट्यूटमधून पाठवण्यात आली. यासाठी सुरक्षेसाठी आम्ही व्यापक व्यवस्था करण्यात आली होती.

सीरम इन्स्टिट्यूटमधून कोव्हिशिल्ड लस घेऊन निघालेले तीन ट्रक मंगळवारी पहाटे पुणे विमानतळावर पोहोचले. ही लस देशातील विविध ठिकाणी रवाना करण्यात आली. १६ जानेवारीपासून लसीकरण सुरु होत आहे. सीरमला कोव्हिशिल्ड लसीची १.१ कोटी डोसची ऑर्डर मिळाली आहे. या ऑर्डरची किंमत १३०० कोटी रुपये आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आणि कोरोना लसीकरणाचा नुकताच आढावा घेतला. संक्रांत पार पडल्यानंतर लसीकरणाला सुरुवात होणार आहे. पहिल्यांदा आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन कर्मचारी यांना पहिल्यांदा प्राधान्य देण्यात येणार आहे. जवळपास यामध्ये ३ कोटी लोकांना लस टोचली जाईल.

Exit mobile version