Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

ब्रिटनमधून आलेल्या महाराष्ट्रातील 8 जणांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे, आरोग्यमंत्री टोपेंची माहिती!

मुंबई | कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असताना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांमध्ये हळूहळू वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोनाच्या नव्या स्ट्रेनच्या रुग्णांची संख्या आता 38 वर पोहोचली आहे. अशातच कोरोना विषाणूच्या नव्या स्ट्रेनने अखेर महाराष्ट्रात एंट्री केली आहे. ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आल्याची माहिती खुद्द आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

राजेश टोपे यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. ट्वीटमध्ये राजेश टोपे म्हणाले, ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज वर्षा येथे कोरोना लसीकरणाबाबत बैठक घेतली. तसेच ब्रिटनहून आलेल्या 8 प्रवाशांना नव्या विषाणूची लागण झालेली आहे त्याबाबत आरोग्य विभाग व मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा केली व अधिक दक्षता ठेवण्याचे निर्देश दिले. महाराष्ट्रात कोरोनाचं हे नवं संकट राज्यात धडकण्यापूर्वीच आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आणि त्याच धर्तीवर नियमांचं अधिक काटेकोरपणे पालन केलं गेलं. देशात युकेहून परतलेल्या आणि प्रवासाचा संदर्भ असलेल्या काही प्रवाशांना कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग झाल्याचं वृत्त हाती आलं आणि तणावाच्या परिस्थितीत आणखी वाढ झाली. मुंबई, नवी मुंबई, ठाणे- कल्याण, पुणे अशा ठिकाणी युकेहून आलेल्या प्रवाशांची संख्याही हजारांच्या घरात पोहोचली

Exit mobile version