Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

शेतकऱ्यांच्या ऊस एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या तालुका अध्यक्षांचा आत्मदाहणाचा प्रयत्न!

Spread the love

इंदापूर | आज छत्रपती सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्निप्रदीपन कार्यक्रम चालू होता त्याच वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष विकास उर्फ नानजी बाबर यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांना सुरक्षा रक्षकानी ताब्यात घेतलं छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या बॉयलर अग्नी प्रदीपनाचा कार्यक्रम सुरू होता.

कारखान्याचे उपाध्यक्ष अमोल पाटील व त्यांच्या पत्नी आणि सोलापूर पोलीस उपायुक्त वैशाली पाटील यांच्या हस्ते कार्यक्रम चालू होता अचानक घोषणा देत विकास बाबर पाठीमागून आले. त्यांनी रॉकेल अंगावर ओतून घेत, छत्रपती कारखानाच्या ऊस उत्पादकांची राहिलेली एफआरपी देत नाही यावरून संचाकल मंडळाचा निषेध करत अंगावर रॉकेल ओतले. आणि निषेध केला.अशी घटना अचानक घडल्या मुळे सगळे गोंधळले पण विकास बाबार यांनी केलेल्या या आंदोलना मुळे शेतकरी वर्गा कडून विकास बाबर यांचं कौतुक होत आहे

Exit mobile version