Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

महिलावरील होणारे अत्याचार थांबविण्याकरिता कळंब तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन!

Spread the love

परवेज मुल्ला 
उस्मानाबाद | महाविकास आघाडीच्या काळात महाराष्ट्रासह उस्मानाबाद जिल्ह्यातील महिला सुरक्षा प्रश्न अतिशय गंभीर होत असून महाराष्ट्र व जिल्ह्यातील महिला सुरक्षेचा प्रश्न अतिशय गंभीर होत असून महाराष्ट्र व जिल्हात बलात्कार ,अत्याचार, विनयभंग व हत्याकांडाचे सत्र सुरूच आहे त्यातच कोरोना महामारी सारख्या अतिसंवेदनशील काळातही covid केअर सेंटर व हॉस्पिटलमध्ये कार्यरत महिला अधिकारी/ कर्मचारी यांच्या वरील अत्याचार व विनयभंगाचे सत्र ही सुरुवात आहे.या सर्व बाबी वरून असे स्पष्ट होते की हे सरकार महिला सुरक्षा बाबत किती असंवेदनशील व निष्क्रिय आहे या सरकारने प्रशासनावर अंकुश न ठेवल्याने प्रशासन देखील महिला अत्याचाराच्या घटना गांभीर्याने घेत नाही.

यामुळे आम्ही या सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करत करत महिलांच्या सुरक्षित बाबत निष्क्रिय व झोपेचे सोंग घेतलेले या सरकारला जागे करण्यासाठी महाराष्ट्रातील व जिल्ह्यातील महिलांच्या सुरक्षेसंबंधी शासनाने तात्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी अन्यथा भारतीय जनता पार्टी कळंब तालुक्याच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल अशा आशयाचे निवेदन आज भारतीय जनता पार्टी तालुकाप्रमुख अजित पिंगळे यांच्या वतीने देण्यात आले. यावेळी रामहरी शिंदे, अरुण चौधरी, संदीप बाविकर, माणिक बोंदर, शिवाजी गिड्डे , संजय जाधवर, मिनाज शेख, दिलीप पाटील, अनिल टेकाळे, शंकर यादव, रामकिसन कोकाटे, प्रणव चव्हाण, विजय कवडे, प्रशांत लोमटे, आप्पासाहेब शिंदे, नारायण टेकाळे, रंजीत कोकाटे, प्रदीप फरताडे, आबासाहेब गायकवाड, अण्णासाहेब शिंदे, राजपाल भोंडवे उपस्थित होते.

Exit mobile version