इंदापूर | निमगाव केतकीच्या इतिहासात प्रथमच कमी वयात सरपंच पद मिळालेले मा दशरथ तात्या डोंगरे यांचे चिरंजीव विद्यमान सरपंच माप्रविण डोंगरे यांनी सरपंच पदाची सूत्रे हातात घेतल्यापासून निमगाव केतकी गावाची वाटचाल हि स्मार्ट सिटीकडे चालू ठेवली आहे त्यातच आज निमगांव–केतकी मधील ग्रामीण रुग्णालयाच्या जवळ इंदापूर–बारामती मुख्य रस्त्यालगत असणाऱ्या पुणे जिल्हा वार्षिक योजना सन 2020-21 विशेष घटक पुनर्विनियोजन योजने अंतर्गत मंजूर व्यायामशाळा व क्रीडा साहित्य अंतर्गत व्यायामशाळेचे ओपन जिमचा उद्घाटन सोहळा पार पडला.
यामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार मा. श्री.दत्तात्रेय मामा भरणे होते, व त्यांच्याच हस्ते हा युवकांसाठी व तरुणपिढीला असलेल्या ओपन व्यायामशाळेच्या उदघाटनाचा कार्यक्रमपार पडला. भविष्यात निमगाव केतकीचा चेहरा मोहरा बदलून टाकणार त्यासाठी मी माझे वर्चस्व पणाला लावले असे यावेळी प्रविण डोंगरे यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलेव निमगावकरांनी साथ देण्याची विनंती देखील यावेळी केली.
यावेळी ग्रामपंचायत निमगाव–केतकीचे युवा स्मार्ट सरपंच प्रविण भैय्या डोंगरे, उपसरपंच मा सचिन चांदणे तसेच ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामपंचायतसदस्य तसेच गावतील पदादिकारी, युवक वर्ग व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी निमगाव केंतकीमधील युवकांनी सरपंच प्रविणडोंगरेंचे आभार व्यक्त केले.