Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

Good News; सिरम इन्स्टिट्यूट ने बनवली पहिली स्वदेशी न्यिमोनियावरील लस!

Spread the love

पुणे | ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया व्ही.जी. सोमनी यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया प्रायव्हेट लिमिटेडच्या देशी न्यूमोकोकल पॉलिसाकराइड कंजूगेट लसी ला मान्यता दिली असून त्यामुळे न्यूमोनियाविरूद्धची पहिली स्वदेशी विकसित लस बनली आहे, अशी माहिती सरकारने बुधवारी दिली. कंपनीची लस हि अर्भकांमध्ये आक्रमक वाढणारा रोग आणि न्यूमोनियाविरूद्ध लसीकरणासाठी वापरली जाते भारत आणि गॅम्बिया येथे तीन-टप्प्यांच्या चाचणीनंतर मंगळवारी सीरम संस्थेला डीसीजीआयकडून मान्यता मिळाली, असे केंद्र सरकारने सांगितले.

केंद्र सरकारच्या क्लिनिकल ट्रायल रेजिस्ट्रीनुसार, चाचणीचा पहिला टप्पा २०१ तरुणा मध्ये व 34 तरुण प्रौढांमध्ये, तर दुस टप्प्यात १२-१-१५ महिन्यांच्या ११४ मुलांमध्ये घेण्यात आला.
न्युमोकोकल कंज्युएट लस चा तिसरा टप्पा चाचणी सहा ते आठ वयोगटातील 448 बालकांवर घेण्यात आला आणि गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये ही नोंदणी पूर्ण झाली.

“क्लिनिकल ट्रायल डेटासह अर्जाचा भारतीय औषध नियंत्रक जनरल ऑफिस ऑफिसने विशेष लसींसाठी विशेष तज्ज्ञ समिती (एसईसी) च्या सहाय्याने आढावा घेतला आहे. समितीने या लसीला बाजारपेठ अधिकृत करण्यास परवानगी देण्याची शिफारस केली, असे केंद्र सरकारच्या निवेदनात म्हटले आहे. यापूर्वी, निम्युकोकल लस देण्याची भारताची मागणी मोठया प्रमाणात होती पण भारतीय बनावटीची पहिली लास बनत असल्याचं आरोग्य मंत्रालयाने सांगितलं

Exit mobile version