इंदापूर | इंदापूर तालुक्यातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये गरजू रुगणांपर्यंत मोफत रक्त पुराविण्याची संकल्पना घेऊन छोट्याश्या गावातून शिवश्री भूषण सुर्वे यांनी या कार्याला सुरुवात केली, आणि आज स्वतःच्याच गावात बरेच अडथळे पार करून सामाजिक कार्यातहि राजकारण करू पाहणाऱ्यांची चांगलीच धांदल उडवली, छोट्याश्या गावात कोरोनासाठी भयंकर परिस्थितीमध्ये, २ ठिकाणी रक्तदान शिबिराचे कार्यक्रम असताना निमगाव केतकी व परिसरातील लोकांनी अखेर शिवशंभू ट्रस्टच्या कामाची दखल घेत व ट्रस्टच्या कमावरती विश्वास ठेवत ६६ जणांनी रक्तदान केले. यावेळी पुण्याच्या अक्षय ब्लड बँकेचे सहकार्य लाभले, काही लोकांनी बाहेरची ब्लड बँक आहे असे समजून दिशाभूल करण्याचाही प्रयत्न केला, परंतु अक्षय ब्लड बँकेचे चेअरमन संजयकुमार शिंदे यांनी भिगवण, बारामती, माळशिरस, पुणे, सातारा, सोलापूर व लेकराचं इंदापूरमध्येही रक्ताची बॅग उपलब्ध करून देण्याचीहि ग्वाही यावेळी दिली. कोणताही खोटेपणा न करता सोबत रक्तदान केलेल्या लोकांची लिस्ट सुद्धा जोडली आहे असे यावेळी संस्थापक/अध्यक्षांनी सांगितले.
कोरोनासारख्या भयंकर परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा जाणवू नये यासाठी श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून वेळोवेळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते, तसेच आजही निमगाव केतकी मध्ये श्री संत सावतामाळी मंदिर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करन्यात आले होते. आपण देखील रक्तदान करून एखाद्या गरजवंताची निकड पुर्ण करण्याकरीता पुढे यावं या करीता येथे रक्तदाना करीता काही स्लोगन्स् देत आहोत. यामुळे तुमची रक्तदान करण्याची भावना वाढीस लागेल व आपण रक्तदान करून एखाद्या गरजवंतांची गरज पुर्ण करू शकाल. हे महादान करून पुण्य पदरात पाडुन घेउ शकाल.
आज दि ३०/०४/२०२१ रोजी श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्य व निमगाव केतकी समस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर श्री संत सावतमाळी मंदिर, निमगाव केतकी येथे आयोजित करण्यात आले असुन यावेळी मा.श्री नामदार दत्तात्रय (मामा) भरणे (मंत्री महाराष्ट्र राज्य व सोलापूर जिल्हा पालकमंत्री) पुणे जिल्हा परिषद सदस्य, मा. आरोग्य सभापती प्रवीण भैया माने, निमगाव केतकीचे विद्यामन सरपंच श्री प्रवीण (भैय्या) डोंगरे, इंदापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक (PI) श्री धन्यकुमार घोडसे साहेब तसेच निमगाव केतकी पोलिस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक (API) श्री. बिराप्पा लातुरे साहेब, मार्गदर्शक डॉ. मिलिंद खाडे सर, आमचे मार्गदर्शक व शिवशंभू ट्रस्ट तालुका अध्यक्ष मनोज आण्णा राक्षे, शिवशंभू ट्रस्टचे उपाध्यक्ष शिवश्री विवेक शिंदे, भिगवण शहर अध्यक्ष सुरज पुजारी, सेक्रेटरी सुनील सुर्वे, माळशिरस तालुका अध्यक्ष रणजितदादा गायकवाड, तालुका कार्याध्यक्ष नितीन जगदाळे, सदस्य सचिन भोसले, श्री प्रतीक मिरघणे, सचिनजी देशमाने, झी २४ तास चे पत्रकार जावेद मुलांनी सर, हेल्थ–कोच आकाश माने, श्री सुरज शेख, पक्षी मित्र श्री धनंजय राऊत, चि.तेजस हेगडे अध्यक्ष पोलिस बॉईज असोशिएशन इंदापुर यावेळी उपस्थित राहुल मोलाचे सहकार्य लाभले.
काही वेळेस निगेटिव्ह रक्तगटाचा डोनर किंवा कोणत्याही ग्रुपचा डोनर शोधण्यास बरेच अडथळे येत असल्याकारणाने ट्रस्टच्या माध्यमातून शिवशंभू ब्लड फौंडेशन हे अप्लिकेशन गुगल प्ले स्टोअर वरती लाईव्ह केले आहे याचा आपणास नक्कीच फायदा होईल असेही यावेळी शिवश्री भूषण सुर्वे यांनी यावेळी जाहीर केले, व अप्लिकेशन आपण सर्वानी डाउनलोड करावे व ट्रस्ट च्या सामाजिक कार्यातही आपण हातभार लावावा असेही आव्हान यावेळी त्यांनी केले.
ॲप्लिकेशनची लिंक:👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=in.blooddoner