Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

श्री शिवशंभू ट्रस्ट आणि वालचंदनगर पोलीस स्टेशनच्या संयुक्त विद्यमाने इंदापूर तालुक्यातील आजपर्यंतचे रक्तदान शिबिराचे रेकॉर्डब्रेक; ३०० रक्तदात्यांनी केले रक्तदान!

इंदापूर | पुणे जिल्ह्यात मागील २ वर्षांपासून आपण पाहत आला आहेत शिवशंभू ट्रस्ट आणि सर्वच सामाजिक संस्था, प्रतिष्ठान यांच्या सोबत शिबीर घेऊन गरजेच्या वेळी लोकांना रक्त उपलब्ध होत आहे असा विश्वास बसता लोकांनी ट्रस्टच्या माध्यमातून होणाऱ्या रक्तदान शिबिरास उत्स्फुर्त प्रतिसाद द्यायला चालू केले हे आपण पाहत आहात.

अलीकडच्या काळामध्ये कोरोनाची तिसरी लाट व कोविड लसीमुळे रक्ताचा मोठ्या प्रमाणावरती तुटवडा जाणवू लागला होता हेच पाहता शिवशंभू ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे, उपाध्यक्ष विवेक शिंदे, रणजित गायकवाड यांनी वालचंदनगर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक बी. एन. लातुरे साहेब यांना विनंती केली असता त्यांनी लगेच रक्तदान शिबिराचे आयोजन करण्याचे कर्मचारी व जवळच्या मित्र परिवाराला सांगितले, आणि सर्वजण कामालाहि लागले.

सकाळी शिवशंभू ट्रस्टचे संस्थापक/अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे व पत्नी प्रीती सुर्वे यांनी रक्तदान करून शिबिरास सुरुवात केली. सोबतच सर्व पोलीस कर्मचारी अधिकारी यांनीही रक्तदान करून आपले कर्तव्य पार पडले, हे बघत असतानाच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनासुद्धा पाहता पाहता तालुक्यातील रक्तदान शिबिराचा रेकॉर्ड मोडत ३०० रक्तदात्यांनी रक्तदान करून आपल्यालाही सामाजिक कार्याची जण आहे हे यावेळी दाखवून दिले. सर्व कार्यक्रम कोरोनाच्या नियमांचे पालन करून व्यवस्थितरित्या पार पडला, लातुरे साहेब, व विनोद पवार साहेब यांनी रक्तदात्यांचे यावेळी आभार मानले.

FacebookTwitterWhatsAppShare
Exit mobile version