Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

श्री शिवशंभु चॅरिटेबल ट्रस्ट कमिटीच्या माध्यमातून जामखेड मध्ये रक्तदानाच्या माध्यमातून अजून एका विक्रमाला गवसणी

Spread the love

जामखेड, प्रतिनिधी दत्ता वाघमारे

कोरोणाच्या महामारी मध्ये महाराष्ट्राला रक्ताचा तुटवडा भासू न देणारे श्री शिवशंभू चारीटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्य हे नाव लोकांच्या कानावरती आल्यानंतर मोफत रक्ताची बॅग देणे हा उद्देश लोकांना सहजरीत्या आता समजत आहे त्याचा प्रत्यय आज नगर जिल्ह्यामध्ये आला श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट कमिटी महाराष्ट्र राज्याच्या वतीने पूर्ण बीड जिल्ह्याच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घेऊन रुग्णांना रक्ताची बॅग उपलब्ध करून देण्यासाठी नावारूपाला आले आहे त्याच माध्यमातून बीड जिल्ह्याच्या शेजारी असलेला अहमदनगर जिल्हा यांनी आज शिवशंभु ट्रस्टच्या माध्यमातून रक्तदान शिबिर घ्यावे म्हणून शिवशंभु ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे यांना विनंती केली असता अवघ्या 2 दिवसांमध्ये या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले

समता तरुण मंडळ जामखेड व श्री शिवशंभू चारीटेबल ट्रस्ट अहमदनगर जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज समता तरुण मंडळाचे अध्यक्ष संतोष भाऊ गव्हाळे यांच्या जन्मदिनाच्या निमित्त डॉ मेबल आरोळे नाट्यगृहांमध्ये या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये अहमदनगर ब्लड बँक व अक्षय ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर पार पडले यामध्ये श्री शिवशंभू चारीटेबल ट्रस्ट च्या नावावर ती विश्वास ठेवून शेवटच्या क्षणापर्यंत 277 लोकांनी रक्तदान करून जामखेड व नगर जिल्ह्यातील रक्तदानाचा नवीन विक्रम केला गेला यामध्ये प्रामुख्याने श्री शिवशंभू चारीटेबल ट्रस्ट बीड जिल्ह्याचे अध्यक्ष नितीन पवार, बीड जिल्हा उपाध्यक्ष लखन वीर तसेच बीड जिल्हा सोशल मीडियाचे युवा नेतृत्व दत्ताभाऊ वाघमारे व समता तरुण मंडळाचे सर्वच सदस्य पदाधिकारी यांच्या कठोर परिश्रम मधून हे शिबीर पार पडले अखेर रात्री सात वाजेपर्यंत येशील चालू होते

तसेच समता तरुण मंडळाचे अध्यक्ष संतोष भाऊ गव्हाळे यांनीदेखील आज माझा वाढदिवस रक्तदान शिबिर घेऊन खूप छान पद्धतीने पार पडला व कोणत्याही प्रकारचा वायफट खर्च न करता शिवशंभु ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान शिबिर घेऊन पार पडला याचा मला खूप अभिमान आहे व प्रत्येक गरजू व्यक्तीला ट्रस्ट माध्यमातून रक्ताची मोफत बँक पुणे बीड सोलापूर सातारा अहमदनगर मुंबई येथून दिली जाईल असे ट्रस्टच्या माध्यमातून यावेळी जाहीर करण्यात आले

Exit mobile version