Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट महिला कमिटीकडून पुण्यात रक्तदान करून राजमाता जिजाऊ मासाहेबांना मानाचा मुजरा!

Spread the love

पुणे | महाराष्ट्रामध्ये रक्तदान क्षेत्रात सर्वाना परिचित असणारी संस्था म्हणजे श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट, त्याचाच आज प्रत्यय आला.आज १२ जानेवारी जिजाऊ मासाहेब जिजाऊ यांची जयंतीच्या निमित्ताने पुण्यामध्ये शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट चे संस्थापक/अध्यक्ष व भ्रष्टाचार विरोधी जनशक्ती पुणे जिल्हा युवक उपाध्यक्ष शिवश्री भूषण सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली ओम ब्लड बँक, रास्ता पेठ पुणे येथे जिजाऊ मासाहेबांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून रक्तदानाचे उदघाटन केले. यावेळेस शिवशंभू महिला प्रदेशाध्यक्षा प्रीतीताई सुर्वे, पुणे शहराअध्यक्षा सोनालीताई जाधव, महिला सदस्या उर्वशी जगताप, मेघा शेट्टी, रेश्मा माथवड, स्वप्ना पायगुडे यांनी स्वतः रक्तदान करून सामाजिक कार्यातून जयंती उत्सव साजरे करता येऊ शकतात हे दाखवून दिले.

या वेळी ओम ब्लड बँकेचे चेअरमन राहुल सैंदाणे, डॉ जितेंद्र सुरु, टेक्निशियन मुनेश कोल्हे, टेक्निकल सुपरवायझर पी.के. पाटील, पूजा येलगुडे, हर्षदा, वृषाली, सिद्धाराम तुपद, सोनाली मानकर या सर्व ब्लड बँकेच्या स्टाफ ने विशेष सहकार्य केल्यामुळे हे शक्य झाले, असे सोनालीताई जाधव यांच्याकडून सांगण्यात आले. या रक्तदात्यांना श्री शिवशंभू ट्रस्ट चे संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते एक गुलाबाचे फुल, शिवशंभू ट्रस्टचे मास्क, डेटॉल हॅन्ड सॅनिटायझर, व शिवशंभू ट्रस्ट चे सन्मानपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. कमी वेळात या कार्यक्रमाचे नियोजन केल्यामुळे ओम ब्लड बँकेचे ट्रस्ट च्या वतीने सर्वाना मास्क देऊन आभार मानण्यात आले.

देशासह राज्यात कोरोना विषाणू संसर्ग झाल्यानंतर राज्य सरकारनं सार्वजनिक कार्यक्रमांवर निर्बंध आणले आहेत. राज्य सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक आणि महापुरुषांच्या जयंती, स्मृतिदिन कार्यक्रम मर्यादित स्वरुपात साजरे करण्याचे आवाहन केले होते. राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे दरवर्षी शिवभक्त मोठ्या प्रमाणावर जमा होतात. या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्हा प्रशासनानं सिंदखेड राजामध्ये 11 आणि 12 जानेवारीला जमावबंदी आदेश लागू करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कोरोना विषाणू संसर्ग सुरु झाल्यापासून सर्वच धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रम मर्यादित स्वरुपात करण्यात आहेत. त्याप्रमाणं राष्ट्रमाता जिजाऊ जन्मोत्सवावेळी देखील नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलेय.

आज महिलांना कोणाला रक्तदान करायचे असल्यास ओम ब्लड बँकेशी संपर्क साधावा.
संपर्क: ९६९६९६०३३१, ९२२५५०८००७,८६९८८९९०६७

Exit mobile version