सासवड | छत्रपती संभाजी महाराजांचे नाव बिडी सारख्या उत्पादनाला देणे हे अतिशय चुकीचे असून व निंदनीय असून ते नाव हटवावे या मागणीसाठी शिवधर्म फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे व महाराष्ट्रातील सर्वच शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता आणि अखेर या उपोषणाला कालपासून सुरुवातही झाली.
महाराष्ट्रात गेली 80 वर्षापासून शिवाजी बिडी चे उत्पादन होत होते या शिवाजी बिडी चे नाव बदलण्यासाठी 1975 साले आंदोलन झाले त्यावेळी तिचे नाव बदलून संभाजी बिडी असे त्या कंपनीकडून ठेवण्यात आले त्यामुळे महापुरुषांची नावे तंबाखूजन्य उत्पादनांना देणे चुकीचे असल्याचे मत शिवधर्म फाउंडेशनच्या वतीने यावेळी सांगण्यात आले त्याच पार्श्वभूमीवर पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या नारायण पेठ या गावात शिवधर्म फाऊंडेशनचे अध्यक्ष दीपक काटे तसेच शिवधर्म फाऊंडेशनचे सर्वच सदस्य त्याप्रमाणे मच्छिंद्र टिंगरे सुनील पालवे, रवी पडवळ, सागर पोमन, दिनेश ढगे यांनी उपोषणाला सुरुवात केली व महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाचा गैरवापर करणाऱ्या संभाजी बिडी या कंपनीने नाव बदलल्याशिवाय आम्ही या उपोषणामधून माघार घेणार नसल्याचे उपोषणकर्त्यांची कडून या वेळी सांगण्यात आले.
याच मागणीसाठी शिवधर्म फाऊंडेशनच्या महाराष्ट्र मधील पुणे, बीड, चंद्रपूर,वसमत, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद असे अनेक तालुक्यातून जवळपास पंधरा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले होते परंतु सरकारने याची कसल्याही प्रकारची दखल घेतली नाही म्हणून आंदोलनाला सुरुवात करण्यात आल्याचे शिवधर्म फाउंडेशन च्या वतीने सांगण्यात आले त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज तथा खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी या आंदोलनास जाहीर पाठिंबा दिला असल्याची माहितीही यावेळी शिवधर्म फाउंडेशन च्या वतीने सांगण्यात आले