महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात रात्रीची संचारबंदीआणि विकेंड लॉकडाऊन लावण्यात आला आहे.
राज्यात करोनाचा संसर्गाचा उद्रेक पाहायाल मिळत आहे. दिवसेंदिवस करनाबाधितांची संख्या अधिकच वाढत आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर नवीन करनाबाधित आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही वाढ सुरूच आहे. राज्य शासनाने या पार्श्वभूमीवर कठोर निर्बंध लागू केले असून, संसर्ग रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र तरी देखील दररोज करोनाबाधित मोठ्यासंख्येने आढळतच आहेत. आज दिवसभरात राज्यात ४७ हजार २८८ करोनाबाधित वाढले असून, १५५ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.८३ टक्के एवढा झाला आहे. राज्यात आज रोजी एकूण ४,५१,३७५ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
Mahrashtra reports 47,288 new #COVID19 cases, 26,252 discharges and 155 deaths.
Total cases: 30,57,885
Total discharges: 25,49,075
Death toll: 56,033
Active cases: 4,51,375 pic.twitter.com/a9YLlwdzsu— ANI (@ANI) April 5, 2021
दरम्यान, आज २६ हजार २५२ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण २५,४९,०७५ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८३.३६ टक्के एवढे झाले आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,०७,१५,७९३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ३०,५७,८८५ (१४.७६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २४,१६,९८१ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २०,११५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील सर्व दुकानं बंद ठेवण्याच्या निर्णयाला मुंबई शाॅप रिटेल असोसिएशनचा विरोध
दुकानात भरलेला माल सडेल, त्याची भरपाई कोण देणार, जागेचं भाडं, कामगारंचे पगार कोण देणार असा सरकारला थेट सवाल
याबाबत सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अशी पत्रातून मागणी
राज्यात 13 लाख दुकाने बंद, मुंबईत 4 लाख दुकानं बंद, केवळ अत्यवश्यक सेवेत मोडणारी दुकाने सुरू, याची संख्या मुंबईत 35 हजार
FRTWA चे अध्यक्ष विरेन शाह यांनी दिली माहीती
नागपूर शहरात आजपासून 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध
– अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं बंद
– धार्मिक स्थळं, खाजगी कार्यालय राहणार बंद
– मिनी लॅाकडाऊनसाठी नागपूर पोलीस सज्ज
– नियम तोडणाऱ्यांवर पोलीस करणार कारवाई
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे अक्कलकोट स्वामींचे दर्शन पुन्हा बंद
प्रशासनाच्या आदेशान्वये मंदीर बंद करण्याचा समितीचा निर्णय
३० एप्रिल २०२१ अखेर रात्री १२ वाजेपर्यंत वटवृक्ष मंदीर भाविकांच्या दर्शनाकरिता बंद ठेवणेबाबत
मंदिरातील नियमित धार्मिक विधी, पूजा, आरती इत्यादी धार्मिक उपक्रम नियमित पार पडणार
औरंगाबाद शहरात आज पुन्हा 1536 कोरोना रुग्णांची वाढ
आकडा पोचला 89929 वर
तर काल एका दिवसात 26 कोरोना बाधित रुग्णांचा झाला मृत्यू
सध्या 15239 रुग्णांवर उपचार सुरू
ब्रेक द चेन अंतर्गत मंदिर 30 एप्रिल पर्यंत बंद राहणार असल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचा निर्णय
कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी जोतिबाची यात्रा होतेय रद्द
26 एप्रिलला होणार होती जोतिबाची चैत्र यात्रा
तर 27 एप्रिल ला होणारा करवीर निवासिनी अंबाबाईचा रथोत्सवही रद्द
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची माहिती
शनिवार रविवार ही राहील संचारबंदी
वैद्यकीय सेवा ,किराणा ,भाजीपाला पेट्रोल पंप करणार सुरू
ब्युटीपार्लर, शाळा महाविद्यालय शिकवण्या राहणार बंद
30 एप्रिल पर्यंत राहणार सोलापूर शहर जिल्ह्यात कडक निर्बंध
तालुक्यात एकूण 22 गावांमध्ये सोमवारी एकूण तब्बल 73 पॉझिटिव्ह अॅक्टिव्ह रुग्ण
अचानक वाढलेल्या रुग्ण संख्येमुळे मेळघाटात आदिवासीसह प्रशासनात खळबळ उडाली आहे
पुण्यात गेल्या 24 तासात 4 हजार 77 नव्या रुग्णांची भर
3 हजार 240 जण पूर्णपणे कोरोनामुक्त
पुण्यात आज 46 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
पुण्यात सध्या 42 हजार 741 रुग्णांवर उपचार सुरु
गेल्या 24 तासांत मुंबई 9 हजार 857 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
3 हजार 357 रुग्ण कोरोनामुक्त
आज दिवसभरात 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
मृत्यू झालेल्या रुग्णांपैकी 13 जणांना काही दीर्घकालीन आजार
मृतांमध्ये 11 पुरुष तर 10 महिलांचा समावेश
गेल्या 24 तासांत राज्यात 47 हजार 288 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह
दिवसभरात 26 हजार 252 रुग्ण कोरोनामुक्त
दिवसभरात 155 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
सध्या राज्यातील मृत्यू दर 1.83 टक्के एवढा आहे