संभाजी राजे यांनी राज्यसभेत वेगळी आणि राज्यात वेगळी भूमिका घेऊन वातावरण बिघडवू नये; प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड!
मुंबई : मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाज आरक्षणासाठी पुन्हा आक्रमक झाला आहे. निदर्शने, मोर्चे, आंदोलनाच्या माध्यमातून मराठा वर्ग राज्यसरकारकडे न्याय मागत आहेत. अशा परिस्थितीत मराठा नेतेही त्यांच्या सोबत येऊन मराठा आरक्षणासाठी आम्ही आपल्या सोबत असल्याचे सांगत आहेत. मात्र, या आरक्षणाबाबत एक नवा खुलासा समोर आला आहे. या खुलाशामधून युवराज छत्रपती संभाजी राजेंची आरक्षणाबाबतची भूमिका दुटप्पी असल्याचे म्हटले आहे. युवराज संभाजी राजे यांनी राज्यसभेत वेगळी आणि राज्यात वेगळी भूमिका घेऊ नये व वातावरण बिघडवू नये असा सल्लादेखीव दिला आहे. मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी मराठा आरक्षणाबाबत मोठा खुलासा केला आहे. त्यांनीच छत्रपती संभाजी राजेंनी आरक्षणावरून राज्यातील वातावरण बिघडवू नये असे म्हटले आहे.
काय म्हणाले प्रविण गायकवाड;-
ओबीसी एसई बीसी आणि ई डब्लूएस असा बराचसा वाद सुरू आहे. या अनुशंगाने काही खुलासे करणं गरजेचं वाटतं. केंद्र सरकारने ऑगस्ट 2018ला 102वी घटना दुरूस्ती केलेली आहे आणि या घटनादुरुस्तीमध्ये नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास हे घटनेत आणून घटनेचं संरक्षण देऊन त्याला विशिष्ट अधिकार दिलेत. आणि केंद्र सरकारच्या या नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास याला अधिकार प्राप्त झाल्यामुळे राज्य सरकारच्या स्तरावर कुठल्याही प्रकारचे आयोग निर्माण करता येत नाही. आणि म्हणून ऑगस्ट 2018 चा कायदा असं म्हणतो की कुठल्याही राज्यसरकारला आरक्षणासाठी काही तरतुदी करता येणार नाही कुठलाही प्रवर्ग निर्माण करता येणार नाही म्हणून महत्त्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे केंद्र सरकारने 102 वी राज्यघटनेमध्ये जी तरतूद केली आहे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास याचं राज्यसभेत ज्यावेळेस मतदान झालं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीने व्हीप काढल्यामुळे त्यांच्या राज्यसभेच्या सर्व खासदारांनी त्याला मतदान केलं.
युवराज छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा 102 व्या घटना दुरुस्तीला मतदान केलं. सांगायचं म्हणजे एसईबीसी हा प्रवर्ग राज्य सरकारनं निर्माण केलेल आहे. आणि 102 प्रमाणे तो रद्द ठरतो. हेच आपल्या लक्षात आणून द्याचे आहे. म्हणजे नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासची निर्मिती झाल्यानंतर राज्य सरकारने निर्माण केलेले सर्व प्रवर्ग म्हणजे एसईबीसी रद्द ठरतो. आणि नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लासला आपलं मत देऊन पाठींबा देऊन तो कायदा केलेला आहे. दुसरी घटना दुरुस्ती 103वी ही जानेवारी 2019 ला गटना दुरुस्एती झाली ती म्हणजे ईडब्लूएसची चची घटना दुरूस्त होत असताना राज्यसभेतील सगळे खासदार उपस्थित होते. ईडब्लूएसलाही छत्रपती संभाजी राजेंनी मतदान केले आणि पाठींबा दर्शवला. एसईबीसीचा कायदा करण्याचाही राज्य सरकारला अधिकार नाही आणि याला सुद्धा संभाजी राजेंनी पाठींबा दिल्याचे गायकवाड यांनी यावेळी सांगितले. राज्यसभेत वेगळी आणि राज्यात वेगळी भूमिका नको. मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष गायकवाड म्हणाले आहेत.