Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

राज्यात महसूल विभाग लाचखोरीत पुन्हा अव्वलस्थानी!

पुणे | राज्यात पहिल्या पंधरवड्यात दाखल झालेल्या २५ गुन्ह्यांपैकी ८ गुन्हे एकट्या पुणे विभागातील आहेत. सर्वात कमी म्हणजे, प्रत्येकी केवळ १ गुन्हा मुंबई नागपूर आणि नांदेड विभागात दाखल झाले. ठाणे-२, नाशिक-५, अमरावती-४ आणि औरंगाबाद विभागात-३ असे एकूण २५ गुन्हे दाखल झाले. राज्यातील महसूल आणि पोलिस खात्यात जणू काही स्पर्धाच लागलेली दिसत आहे.

१ जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत पाचशेवर शासकीय कर्मचाऱ्यांवर लाचखोरीचे गुन्हे दाखल झाले. यामध्ये प्रत्येकी २४.७० टक्के वाटा अर्थातच महसूल आणि पोलिस खात्यांचा होता.

ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस पोलिसांनी महसूल खात्याला मागे टाकले. महसूल खाते गेल्यावर्षी दुसऱ्या स्थानी होते. नव्या वर्षाच्या पहिल्याच पंधरवड्यात राज्यात महसूल खात्याच्या लाचखोरांनी हे अव्वलस्थान पुन्हा प्राप्त केले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकृत संकेतस्थळावर या संदर्भातील माहिती दिली आहे.

Exit mobile version