Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

प्लाझ्मा रक्ताची लूट थांबणार; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी प्लाझाची किंमत केली जाहीर!

Spread the love

पुणे | कोरोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीद्वारे उपचार करण्यासाठी प्लाझ्मा अफेरॅसिस पद्धतीने संकलित केलेल्या प्रति डोस प्लाझ्मा बॅगसाठी (200 मि.ली.) खाजगी, विश्वस्त रक्तपेढ्या, रुग्णालयांना रुग्णाकडून 5,500 रुपये इतका कमाल दर आकारण्यास मान्यता दिली आहे. यापेक्षा अधिक दर आकारल्यास त्यांनी आकारलेल्या अतिरिक्त रक्कमेची परतफेड संबधित रुग्णांना करणे अनिवार्य राहील अन्यथा संबंधित रक्तपेढीचा परवाना रद्द करण्याबाबतची कारवाई संबंधित सक्षम प्राधिकाऱ्यामार्फत करण्यात येईल, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यात सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोनाबाधितांवर प्रायोगिक तत्वावर निशुल्क प्लाझ्मा थेरपी उपचार पद्धती वापरण्यात येत आहे. परंतु आता सध्या काही रक्तपेढ्या ह्या पैसा कामविण्यात दंग आहेत जवळजवळ 11,000 रुपये एका प्लझ्मा बॅगेसाठी पैसे घेत असल्याचेही निदर्शनास आले आहे.

केंद्र शासन व सेंट्रल ड्रग स्टॅंडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशने ऑफ लेबल प्लाझ्मा थेरपी वापरण्याच्या मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्यानंतर प्लाझ्माफेरॅसिस पध्दतीने संकलित करण्यात आलेल्या कॉन्व्हॅलेसंट प्लाझ्मा (ऑफ लेबल) वापरण्यासाठी खाजगी व विश्वस्त रक्तपेढ्यांकडून प्लाझ्मा थेरेपीसाठी आवश्यक प्लाझ्मा बॅगसाठी अवाजवी शुल्क आकारले जात असल्याचे निदर्शनास आले.

रुग्णांना किफायतशीर दरात हा प्लाझ्मा उपलब्ध करुन देण्यासाठी या प्लाझ्माचा प्रति डोसची किंमत निश्चित करण्यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेमार्फत तज्ञ समिती गठित करण्यात आली होती. या समितीने प्लाझ्मा अफेरॅसिस पद्धतीने प्लाझ्मा संकलित करण्यासाठी लागणारे खर्च व राष्ट्रीय रक्त धोरणानुसार निश्चित केलेलल्या रक्तावरील अतिरिक्त चाचण्या / विशेष चाचण्या यासाठी आकारण्यात येणाऱ्या सेवा शुल्क हे लक्षात घेऊन दर निश्चिती केलेली आहे.त्यानुसार प्लाझ्मा बॅग (२०० मिली) ५५०० रुपये आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

नॅट चाचणीसह प्लाझ्मा बॅग उपलब्ध करुन दिल्यास या चाचणीसाठी कमाल दर १२०० रुपये प्रति चाचणी (प्लाझ्मा बॅगेच्या किंमतीव्यतिरक्त) तर केमिल्युमिनेसन्स तपासणी करुन प्लाझ्मा बॅग दिल्यास त्यासाठी प्रति चाचणी कमाल दर ५०० रुपये (प्लाझ्मा बॅग किंमतीव्यतिरक्त) आकारण्यास मान्यता दिली आहे.

Exit mobile version