नवी दिल्ली | कोरोनामुळे देशात केलेल्या लॉकडाउनवरुन राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदी सरकारवर हल्ला केला आहे. बुधवारी राहुल गांधींनी एक नवीन व्हिडिओ शेअर केला ज्यामधे अचानक लॉकडाऊन देशाच्या असंघटित घटकांना खूप धोकादायक ठरलं असून ती स्थिती त्यांच्यासाठी मृत्यूदंडासारखे आहे अशी टिका केली आहे. कोरोनाव्हायरसच्या तयारीविषयी आणि सध्याची देशाची गंभीर असलेली अर्थव्यवस्था आणि त्यात सुधारणा करण्याच्या उपाययोजनांविषयी त्यांनी सरकारवर ट्विट करत जोरदार टिका केली आहे.
राहुल यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले की, 21 दिवसात कोरोना संपवण्याचे आश्वासन दिले होते, परंतु कोट्यावधी रोजगार आणि लघु उद्योग संपविले. मोदीजींचा डिज़ास्टर प्लॅन पाहण्यासाठी हा व्हीडिओ पहा’
अचानक किया गया लॉकडाउन असंगठित वर्ग के लिए मृत्युदंड जैसा साबित हुआ।
वादा था 21 दिन में कोरोना ख़त्म करने का, लेकिन ख़त्म किए करोड़ों रोज़गार और छोटे उद्योग।
मोदी जी का जनविरोधी 'डिज़ास्टर प्लान' जानने के लिए ये वीडियो देखें। pic.twitter.com/VWJQ3xAqmG
— Rahul Gandhi (@RahulGandhi) September 9, 2020