Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

आरोग्य कर्मचाऱ्यांची बिन-पगारी फुल अधिकारी, ही संकल्पना राबवणारी पुणे जिल्हा परिषदेची उत्तुंग कामगिरी; आरोग्यमंत्र्यांचे दुर्लक्ष!

Spread the love

पुणे | होय, हे खरे आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी गेली 3 महिने व 15 दिवस उलटून सुद्धा हॉस्पिटलमध्ये वेळेवर जाऊन रुग्णांची तपासणी करून प्रामाणिकपणे काम करत आहेत.

पुणे जिल्हा परिषदेच्या मार्फत ज्या इजेन्सीकडे म्हणजे रक्षक सिक्युरिटी सर्व्हिस & सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे ही सेवा/कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे, त्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांनी पगाराबाबत विचारणा केली असता पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे आरोग्य खत्यांतर्गत पैसे उपलब्ध नाहीत, गेली 6 महिने उलतू आमचे कोटी कोटींची बिले थकीत असल्याचे या एजन्सी कडून सांगण्यात आले. तसेच पुणे जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या DHO हंकारे यांना विचारले असता आरोग्य खत्यांतर्गत गेली 2 महिने कोणताही निधी वर्ग होत नाही असे टाळाटाळीचे उत्तर यावेळी भेटत आहे.

एकीकडे आरोग्य विभागाला मोठ्या उंचीवर घेऊन जाण्याचे स्वप्न मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यमंत्री तानाजी सावंत वेळोलेली आरोग्य खात्याला निधी देत असताना, महाराष्ट्रातील नावाजलेली पुणे जिल्हा परिषदेकडे कर्मचाऱ्यांना द्यायला पगार नाही ही गोष्ट गोंधळाची वाटते असे यावेळी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे, व सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या इजेन्सीकडे पुणे जिल्ह्यातील 5-6 प्राथमिक आरोग्य केंद्रातील अंदाजे 50-55 लोक कंत्राटी पद्धतीने काम करत आहेत. व यांचे पी एफ चे पैसे भरले जात आहेत आणि पगार भेटत नाहीत यामध्ये मंत्री महोदय किंवा स्थानिक आमदारांनी लक्ष घालायची गरज आहे व कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार कसा देता येईल व आरोग्यसेवा मजबूत कशी करता येईल याकडे लक्ष देणे गरजेचे आहेसे यावेळी कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आले,

Exit mobile version