Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

पुणे- मुंबई महामार्गावरून प्रवाशी ड्रायव्हर जाताना शिग्रुबाला का करतात वंदन? जरूर जाणून घ्या!

लोणावळा | मुंबई-पुणे मार्गावर खंडाळ्याच्या घाटात शिंग्रुबा नावाचा धनगर राहत होता. ब्रिटिशांनी मुंबई-पुणे लोहमार्ग व रस्ता (रोड) सह्याद्रीच्या घाटातून तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा “रस्ता’ कसा व कोठे तयार करायचा व रूळ (रेल्वेचे रूळ) कोठल्या भागात टाकायचे, हे ब्रिटिश इंजिनिअरांना समजावून सांगणारा हा धनगर शिंग्रुबा!

धनगरांची स्वत:ची अस्मिता जपत शिंग्रुबाने आधुनिक तंत्रज्ञानाचे आव्हान स्वीकारून मानवजातीच्या कल्याणासाठी कसे अफाट कार्य केले, त्याची चित्तरकथा शिंग्रुबाच्या ओव्यांतून सांगितली जाते . शिंग्रुबा वर्षानुवर्षेब या घाटाच्या कुशीत, डोंगरमाथ्यावर, डोंगर-कपारीत आपली मेढरं चरायला नेत असे.त्यामुळे येथील जमिनीची, कड्याकपारींची, जमिनीच्या भुसभुशीतपणाची व दगडी-टणकपणाची खडा न् खडा माहिती त्याला होती. ही माहिती त्याने इंग्रजांना सांगितली. त्या माहितीच्या आधारेच वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासणी करून, सह्याद्रीच्या खंडाळा घाटात डोंगर फोडून रस्ता तयार केला गेला, बोगदे निर्माण केले गेले व मुंबई-पुणे जोडले गेले.

म्हणूनच शिंग्रुबाला आधुनिक देव मानले जाते . परंतु निर्दयी व धोकेबाज ब्रिटिश अधिकारयांनी रस्ता तयार झाल्यावर शिंग्रुबाला बंदुकीच्या गोळ्या मारून ठार मारले.ज्या जागेवर शिंग्रुबाला ठार मारले, त्या जागेवर, घाटात, शिंग्रुबाचे स्मरणार्थ एक छोटुकले देऊळ बांधले गेले. प्रत्येक ड्रायव्हर, प्रवासी आपले वाहन क्षणभर थांबवून, शिंग्रुबाला वंदन करूनच, पुढे जातो. आजही ही प्रथा पाळली जाते . जर्मन संशोधक प्रो. सोन्थायमर यांनी मराठी भार्षेत धनगरांच्या मौखिक वाङ्मयाचे “छापील’ ग्रंथसंग्रहात जतन करण्याचे महान कार्य केले आहे. प्रोफेसर गुन्थर सोन्थायमर पुण्यात आले. मराठी शिकले व 1966 ते 1991 या काळात धनगरांच्या चालीरीती, संस्कृती,ओव्या,इतिहास, पशुपालन पद्धत यावर जागतिक कीर्तीचे. संशोधन केले.

सौ. वैशाली शिंदे
संस्थापिका /अध्यक्षा
आयडियल इंटरनॅशनल स्कूल

FacebookTwitterWhatsAppShare
Exit mobile version