Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

Breking Updates; पुण्यात पुन्हा विशेष लॉकडाऊन; हे राहणार सुरू!

Spread the love

पुणे | गेल्या दहा दिवसांपासून शहरात लागू करण्यात आलेला लॉकडाऊन उठणार असला, तरी उद्यापासून (शुक्रवार) दिवसाआड (P 1 – P2) सर्व प्रकारची दुकाने तसेच वाइन शॉपसह उघडण्यास परवानगी राहणार असल्याचे महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. राज्य सरकारने 1 जुलै रोजी ठरवून दिलेल्या निर्देशानुसार पुणे शहरात अनलॉक-2 पद्धतीनेच त्यांची अंमलबजावणी होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर नव्याने कंटेन्मेंन्ट झोनची फेररचना करण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पुणे शहरात 13 जुलै ते 23 जुलैपर्यंत विशेष लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. आज रात्री त्यांची मुदत संपत आहे. त्यामुळे शुक्रवारपासून काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली. दरम्यान आज सकाळी पुणे शहरातील 80 व्यापारी संघटनांची शिखर संस्था असलेल्या पुणे व्यापारी महासंघाने महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रूबल अगरवाल यांची भेट घेऊन लॉकडाऊन आणि दिवसाआड दुकाने सुरू करण्यास विरोध दर्शविला होता. त्यामुळे प्रशासन काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.

उद्यापासून हे व्यवसाय सुरू राहणार
★ अत्यावश्‍यक सेवांची दुकाने पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार
★ खाद्यपदार्थांची घरपोच सेवा
★ सायकलिंग, धावणे, चालणे, अन्य व्यायाम
★ वर्तमानपत्राची छपाई आणि वितरण
★ सरकारी कार्यालयांमध्ये 15 टक्के उपस्थिती असावी
★ केश कर्तनालय, स्पा, पार्लर यांना नियम पाळून मुभा
★ टॅक्‍सी, कॅब, रिक्षा, चारचाकी आवश्‍यक प्रवासासाठी मुभा
★ वाइन शॉपसह सर्व प्रकारची दुकाने P1- P2 या पद्धतीने उघडण्यास परवानगी असेल.

Exit mobile version