Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

एकीकडे पुण्यात कडकडीत लॉकडाऊन; दुसरीकडे पाण्यासाठी प्रचंड झुंबड!

Spread the love

पुणे | कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्यासाठी पुण्यात लॉकडाउन २ जाहीर झाला,पुणे शहर पूर्णपणे कडकडीत बंद झाले आहे.पण पाण्यासाठी उरुळी देवाची गावामधील महिला,वृध्द,लहान मुलांची,लोकांची प्रचंड झुंबड उडाली आहे.हे चित्र पाहिले तर आपल्याला कडक उन्हाळ्याची आणि मराठवाड्याच्या दुष्काळी भागाची आठवण होईल पण हे चित्र आहे पुणे शहरातील उरुळी देवाची या गावाची,A ग्रेड महापालिका असूनही दुष्काळी भागासारखी परिस्थिती उरुळी देवाची या गावाची झाली आहे.अनेक पत्रे लिहली ,निवेदने दिली,आक्रोश मांडला,प्रसार माध्यमांनी दखल घेतली पण महापालिका अजुन ही जागी होईना आणि उरुळी करांची दैना संपेना. या साठी ग्रामस्थांनी काही दिवसापूर्वी एकत्र येत काळी फित लावून पुणे महापालिकेचा निषेध देखील व्यक्त केला होता.

यावेळी महिला मोठ्या संख्येने आपअापल्या घरासमोर आणि चौका चौकात एकत्र येऊन डोक्यावर हंडा घेऊन निषेध व्यक्त केला.लाखो रुपये खर्च करून पुणे महापालिकेने मंतरवाडी आणि उरुळी देवाची या गावाला बंद पाइपलाइनच्या माध्यमातून पाणी पुरवठा करण्याचे काम पूर्ण होऊनही पाणी सुरू होत नाही.मंतर वाडीत पाणी येते परंतु उरुळीत पाणी नाही.सध्या कोरोणाचा संसर्ग होऊ नये यासाठी टँकरला होणारी गर्दी टाळून पाइपलाइन ने पाणी सुरू करावी अशी मागणी पुणे महापालिका आयुक्त यांच्याकडे भारिप चे शहराध्यक्ष व उरुळीचे माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी करूनही कोणत्याही प्रकारची दखल आजपर्यंत घेतली गेलेली नाही.

कोरोना मुळे गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले असून सद्या टँकर जवळ मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी पाणी भरण्यासाठी होते. यामुळे कोरोनाचा पादुर्भाव होण्याचा धोका नाकारण्यात येवू शकत नाही.उरूळी देवाची या गावासाठी यापूर्वीच पाण्याच्या लाईन टाकण्यासाठी कोट्यावधी रुपये खर्च पुणे महानगरपालीकेच्या वतिने करण्यात आलेला आहे.शिवाय १० दशलक्ष लिटर ची पाण्याची टाकी ही कचरा डेपोजवळ बांधून बऱ्याच दिवसापासून तयार आहे.

कचरा डेपो परिसरात नलीकेद्वारे पाणी पुरवठा केला जातो त्या प्रमाणे ऊरूळी देवाची गावास का केला जाऊ शकत नाही ? असा प्रश्न निर्माण झालेला आहे. सद्याची परिस्थिती कोरोनामुळे गंभीर आहे.पुण्यातील वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेऊन जिथे जिथे गर्दी टाळता येईल तिथे गर्दी टाळू शकतो व कोरोना ला थांबवू शकतो .त्याप्रमाणे उरुळी देवाची येथील टँकर बंद करून परिसरातील नागरिकांना गर्दीपासून रोखणे शक्य आहे.तरीही महापालिका जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप अतुल बहुले यांनी केला आहे.

तरी टँकरवर पाणी भरणे धोक्याचे आहे,शिवाय सद्या पावसाळी दिवस असल्यामुळे अजूनही लोकांना त्रास होऊ शकतो तसेच कोरोनाची लागण होवु शकते.त्यासाठी महालिकेला जबाबदार धरले जाईल.पालिका प्रशासनाची उदासीनता व त्यांचा भोंगळ कारभार यातून स्पष्ट दिसून येत आहे.आठ दिवसात बंद नलीकेद्वारे पाणी गावाला सुरु करण्यात यावे. अन्यथा मोठे जनआंदोलन उभारण्यात येईल असा इशारा माजी उपसरपंच अतुल बहुले यांनी दिला आहे.

Exit mobile version