Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमिन भुसंपादनामधील देय असलेली रक्कम लवादाच्या निवाड्याप्रमाणे देण्यात यावी; सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

Spread the love

मुंबई | दि.23:पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमिन भुसंपादनामधील देय असलेली रक्कम लवादाच्या (आर्बिट्रेटरच्या) निवाड्याप्रमाणे शेतक-यांना देण्यात यावी असे निर्देश सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री (सा.उ.वगळून) दतात्रय भरणे यांनी दिले.

मंत्रालयातील दालनात राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पुणे -इंदापूर या महामार्गासाठी संपादित झालेल्या जमिनीच्या मोबदल्यासंदर्भात बैठक पार पडली.या बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री दतात्रय भरणे बोलत होते.यावळी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणचे प्रादेशिक अधिकारी अंशुमनी श्रीवास्तव,पुणेचे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस दूरदृश्यप्रणालीव्दारे तसेच उपसचिव श्री.कुलकर्णी, ॲड शीतल चव्हाण उपस्थित होते.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले,पुणे-इंदापूर राष्ट्रीय महामार्गाच्या जमिन भुसंपादनाबाबत शेतक-यांना लवादाने (आर्बिट्रेटरच्या) निर्णय दिला आहे.या लवादाने दिलेल्या निर्णयाप्रमाणे तात्काळ भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणने कार्यवाही करावी असे आदेश राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरणचे प्रादेशिक अधिकारी अंशुमनी श्रीवास्तव यांनी भुसंपादित शेतक-यांच्या असलेल्या तक्रारीवर तसेच प्राधीकरण करत असलेली कार्यवाहीची माहिती या बैठकीत दिली.

Exit mobile version