पुणे जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी ७ महिन्यांपासून पगाराविना; उपमुख्यमंत्र्यांना भूषण सुर्वे यांच्याकडून निवेदन!

इंदापूर | आरोग्य हा किती महत्त्वाचा विषय आहे हे कोविड काळामध्ये महाराष्ट्राने अनुभवले आहे, गेल्या ७ महिन्यांपासून पुणे जिल्ह्यातील आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचारी पगाराविना काम करत आहेत हे ऐकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ पी.एस.ओ अमोल हुक्केरीकर यांना याबद्दल माहिती घेऊन पुढे कार्यवाही व्हावी आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळावा असा आदेश दिला.
शिवसेना वैद्यकीय मदत पक्षाचे पुणे जिल्हाप्रमुख भूषण सुर्वे यांनी काल वैद्यकीय मदत कक्षाचे तसेच उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेशजी चिवटे व वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याध्यक्ष रामहरी राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील आरोग्य विभागातील गेल्या 7 महिन्यांपासून रखडलेल्या वेतनाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन लवकरात लवकर या कंत्राटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत मिळावेत यासाठी निवेदन दिले. निवेदन नेताच तात्काळ एकनाथ शिंदेंनी ही याची सविस्तर माहिती घेऊन लवकरात लवकर या सर्व कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळतील असाही शब्द दिला.
यावेळी निवेदन देताना पुणे जिल्हा शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्र देवरे उपस्थित होते, पुणे जिल्ह्यातील या आरोग्य आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट जयशंकर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या कंपनीकडे असून त्यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी असे सांगितले की पहिल्या ४ महिन्यांचे पगार आम्ही आमच्या खिशातून केले आहेत परंतु गेल्या एक वर्षापासून आरोग्य खात्याकडून आम्हाला कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध झाला नाही त्यामुळे आम्ही पुढील ७ महिन्याचे पगार करू शकत नाही.
आरोग्य कंत्राटी कर्मचारी हे वेळेमध्ये येऊन काम करून जात आहेत, व एकनाथ शिंदे साहेब यांच्या पुढाकाराने लवकरच आरोग्य कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेत मिळेल असे शिवसेना वैद्यकीयचे जिल्हाप्रमुख तथा राज्य कार्यकारिणी सदस्य भूषण सुर्वे यांनी सांगितले.