Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

पीपीई किटचा काळाबाजार रोखण्यासाठी; आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ लक्ष घालण्याची होतीय मागणी!

Spread the love

महामेट्रो न्यूज/मुंबई | कोरोना सारख्या भयंकर काळात खासगी रुग्णालये रुग्णांकडून भरमसाठ बिल आकारत आहेत. पालिका प्रशासनाकडून अशा रुग्णालयांवर कारवाई होत असली तरीही हे प्रकार काही थांबलेले नाहीत. याच पार्श्वभूमीवर वन रुपी क्लिनिकचे संचालक डॉ. राहूल घुले यांनी पीपीई किटसंदर्भात एक ट्विट केले आहे. पीपीई किटची किंमत आजच्याघडीला 200 रुपये असताना, रुग्णालये त्यासाठी रुग्णाकडून 1500 ते 2000 रुपये आकारत असल्याचे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटला अनेकांनी रिट्विट करीत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री यांना टॅग केले आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये रविवारी फेसबुक आणि ट्विटरवर याविषयी जोरदार चर्चा रंगली आहे.

पुणे , मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांचा आकडा सर्वाधिक आहे. रुग्णांना उपचारासाठी बेड मिळालाच तर खासगी रुग्णालयांकडून आकारले जाणाऱ्या बिलांवरील आकडे पाहून रुग्णांच्या पायाखालची जमिनच सरकत आहे. महापालिका प्रशासनाने रुग्णालयातील केवळ बेडचे चार्जेस निश्चित केले आहेत. रुग्णालये पीपीई कीट, कोविड व्यवस्थापन आणि अन्य चार्जेसच्या नावाखाली ही महागडी बिले रुग्णांना आकारत आहेत. नुकतेच कल्याणमधील श्रीदेवी हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाच्या बिलात पीपीई किटसाठी 49 हजार 500 रुपये व उपचारासाठी वापरण्यात आलेल्या साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी साडेसहा हजार रुपये आकारण्यात आल्याची घटना ताजी आहे. अशा सर्व घडामोडींना अनुसरुनच डॉ. राहूल घुले यांनी शनिवारी एक ट्विट केले यामध्ये त्यांनी पीपीई किटची किंमत ही 200 रुपये असताना रुग्णालये त्यासाठी पंधराशे ते दोन हजार रुपये आकारत असल्याचे सांगितले. पीपीई किटच्या या किंमतीवरुन समाज माध्यमावर याविषयी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. लवकरात लवकर आरोग्य मंत्र्यांनी याची दखल घ्यावी असेही यावेळी आव्हान करण्यात आले.

Exit mobile version