पिंपरी-चिंचवड | कार्यसम्राट आमदार लक्ष्मणभाऊ जगताप, शंकर शेठ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच नगरसेवक अंबरनाथ भाऊ कांबळे, नगरसेविका माधवी ताई राजापूर, मा.सौ.सीमा ताई चौगुले यांच्या सोबत राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे २ रे पंतप्रधान स्व.लाल बहादुर शास्त्री यांच्या जयंती निमित्त स्वच्छ भारत अभियान व करोना महामारीच्या काळात कोव्हीड योद्धा म्हणून आपले कर्तव्य पार पाडणारे आरोग्यसेवक व पोलीस दलातील काही होतखोर पोलीस अधिकाऱ्यांना तिरंगा ध्वज, सॅनिटायझर, मास्क देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये जवळपास मास्क १०००, स्यानिटायजर २०० हे भाजीवाले,गरजू गोरगरीब यांना देण्यात आले विशेष म्हणजे तिरंगा ध्वज यासाठी देण्यात आला की जसे आपले सैनीक सीमेवर जीवाची बाजी लावून आपले सौरक्षण करतात त्यांना विरतेचा सन्मान ध्वज म्हणून देतात तसेच ह्या सर्वांनी समाजात राहून आपल्या जीवाची बाजी लावून आपल्या सर्वांचे सौरक्षण केले यासाठी सन्मान चिन्ह म्हणून तिरंगा ध्वज देण्यात आले. यावेळी साई कोंढरे (शहर भाजपा युवा मोर्चा), अभिजित बागुल, शुभम चांद, ऋषिकेश कदम, रोहन गायकवाड, सोहम खंडीझोडे, प्रतीक भोसले उपस्थित होते.
तसेच मा.श्री.रंगनाथ उंडे साहेब (वरिष्ठ पोलीस निरीक्षक-सांगवी पोलीस ठाणे, मा.श्री.भोसले साहेब(पोलीस निरीक्षक गुन्हे विभाग सांगवी पोलीस ठाणे) व त्यांचे सहकारी मा.श्री.उद्धव डवरी साहेब(आरोग्य निरीक्षक) मा.श्री.विनोद कांबळे(मुकादम) व त्यांचे सहकारी यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, व कार्यक्रमाची सांगता झाली.