पिंपरी-चिंचवड | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोना उपचारासाठी सध्या प्लाझ्मा थेरपी प्रभावी ठरत आहे. त्यासाठी प्लाझ्मादान करण्याऱ्यांना पिंपरी-चिचंवड शहर जिल्हा युवक काँग्रेसतर्फे एक हजार रुपयांचा जीवनदाता प्रोत्साहन निधी देण्यात येणार आहे. भारतीय युवक काँग्रेस स्थापना दिन व क्रांती दिनाचे औचित्य साधून ९ ऑगस्टपासून हा जीवनदाता प्रोत्साहन उपक्रम राबविण्यात येणार आहे.
युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष नरेंद्र बनसोडे म्हणाले, की कोरोना रुग्णांवर प्लाझ्मा थेरपी महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांनी आपला प्लाझ्मा दान करून इतरांचे प्राण वाचवावे. तसेच, अधिकाधिक रुग्णांनी पुढे यावे. बऱ्या झालेल्या रुग्णांना प्रोत्साहन मिळावं म्हणून आम्ही युवक काँग्रेसतर्फे एक हजारांचा निधी देणार आहोत. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांनी इतरांसाठी पुढे यावे. प्लाझ्मा दान करावा आणि प्रोत्साहन निधीसाठी ९८६०१७७१७७, ८४८४०८३७३७ या क्रंमाकांवर संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. या बाबत युवक काँग्रेसने पिंपरी-चिचंवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे यांना पत्रदेखील
दिले आहे. तसेच, या उपक्रमाची माहिती कळविली आहे.