Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

पिंपरी-चिंचवडमध्ये रॉबिन हूड आर्मी तर्फ़े अनोख्या पद्धतीने होळी साजरी!

पिंपरी-चिंचवड | रॉबिन हूड आर्मी तर्फ़े २८ मार्च 2021 रोजी आयोजित एक हात मदतीचा या कार्यक्रमाध्ये आदर्श नगर नवी सांगवी मधल्या सर्व माहिलांनी होळीच्या दिवशी पुरानपोळी चा नैवेद्य दाखवून होळी साजरी करत. त्या नैवेद्या बरोबर अजून एक पुरानपोळीचा नैवेद्य रॉबिन हूड आर्मीला दिला तो पुरानपोळीचा नैवेद्य त्यांनी अशा लोकांना दिला ज्यांना तो कधी मिळतही नसेल.

अशा प्रकारे आदर्श नगर नवी सांगवी मधल्या सर्व माहिलांनी 2021 ची होळी वेगळ्या प्रकारची साजरी करत जमा झालेल्या सर्व प्रकारच्या पुरन पोळ्या, पिंपळे गुरव येथील ममता अंध अनाथ केंद्रात जाऊन त्यांनी तेथील अंध अनाथ मुलांना जेवताना वाढल्याने त्यां मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद बघण्यासाठी मिळाला.

या सर्व काय्रक्रमाचे आयोजन रॉबिन हूड आर्मीच्या *सौ.भारती आंगळे व सामाजिक कार्यकर्ते मा.निखिल चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या सोबत *रॉबिन हूड आर्मी चे सभासद आणि समाजसेविका सौ.धनश्री निखिल चव्हाण, रोहित खंडागळे, व इतर मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version