Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

पिंपरी-चिंचवड धोकादायक वळणावर; कोरोनाने घेतले तब्बल 1000च्या वर बळी!

Spread the love

पिंपरी-चिंचवड | पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग वाढतोच आहे. 11मार्च रोजी पहिला रुग्ण आढळला होता. या घटनेला आज 11 सप्टेंबर रोजी सहा महिने पूर्ण झालेत. आणि योगायोगाने मृतांची संख्या एक हजारांवर पोचली. आज शुक्रवारी दुपारी बारा वाजेपर्यंत 1016 जणांचा बळी गेला आहे. गुरुवारी रात्री बारापासून शुक्रवार दुपारी बारा वाजेपर्यंत संपलेल्या बारा तासात 671 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर, 175 जण पाॅझिटीव्ह आढळले. कोरोनाचा पहिला रुग्ण पिंपरी चिंचवडमध्ये अकरा मार्चला आढळला होता. आज या घटनेला सहा महिने पूर्ण झालेत. या कालावधीत चार लाॅकडाउन अनुभवले. त्यानंतर काही नियम शिथिल केले. आता तर उद्योग, व्यवसाय सुरू झालेत. पीएमपी बस सेवा सुरु झाली. जणू कोरोना नाहीच किंवा लोकांच्या मनात कोरोना विषयीची भिती नाही, असे दिसतंय. पण, परिस्थिती गंभीर आहे. दररोज हजारांवर रुग्ण आढळत आहेत. वीसपेक्षा अधिक जणांचा मृत्यू होतो आहे, तरी बहुतांश नागरिक बिनधास्त आहेत. आणि काही झालंच तर यंत्रणेला दोष देत आहेत. आज शुक्रवार दुपारी बारा वाजेपर्यंत 1 लाख 24 हजार 832 जणांचे होम क्वारंटाइन पूर्ण झाले आहे. सध्या 13 हजार 217 जण अॅक्टीव क्वारंटाइन आहेत.

– आता पर्यंत एकूण 59 हजार 708 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 49 हजार 155 बरे झाले आहेत. त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या रुग्णालयात 9 हजार 550 जण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 1016 जणांचा मृत्यू झाला आहे.

– आजपर्यंत 12 वर्षांखालील 4937 मुले, 13 ते 21 वयोगटातील 5145 युवक, 22 ते 39 वयोगटातील 23,853 तरुण , 40 ते 59 वयोगटातील 18210 प्रौढ आणि 60 पेक्षा अधिक वयाचे 7565 जण बाधित झाले आहेत. 

– आजपर्यंत कोरोना संसर्ग झालेल्या 59708 जणांमध्ये  36634 पुरुष, 22674 स्त्रिया व एका तृतीय पंथियाचा समावेश आहे. 
 

Exit mobile version