Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

महाराष्ट्राच्या राजकारणातील बाप पवारच; राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची चंद्रकांत पाटलांवर टीका!

मुंबई | भाजप प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर देत चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपवर घणाघात केला आहे.

काल भाजपाच्या एका महाशयाने, आम्ही तुमचे बाप आहोत असे वक्तव्य केले. त्यांच्या माहिती करता 2019 चे विधानसभा निवडणूक निकाल जाहीर झाल्यावर 105 आमदारांना बेकार करून महाविकास आघाडी सरकार स्थापन करणारे तुमचे बाप कोण आहेत? हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. 2022 चाली पुणे मनपात पुण्याची जनता अजित दादा पवार हे तुमचे बाप आहेत हे सिद्ध करून दाखवेल काळजी करू नको, अशी फेसबुक पोस्ट करून त्यांनी भाष्य केले .

दरम्यान पुणे महापालिकेतील सत्ता आणि प्रभाग समिती अध्यक्षांच्या निवडीचं निमित्त साधून पाटलांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘अजित पवार यांना जर पुणे महापालिकेच्या सत्तेविषयी काही स्वप्नं पडत असतील तर त्यांनी ही स्वप्न पाहण्यात जास्त जास्त ऊर्जा वायाला घालवू नये. कारण त्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी ती म्हणजे आम्ही पण त्यांचे बाप आहोत.’ असा टोला पाटील यांनी अजित पवारांना लगावला होता

Exit mobile version