Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवाळीतील पवारांच्या गोविंदबागेतील ‘स्नेहभेट’ रद्द!

बारामती | बारामतीत दरवर्षी दिवाळी पाडव्यानिमित्त होणारा पवार कुटुंबीयांचा भेटीगाठींचा कार्यक्रम यंदा होणार नाही. करोनाच्या पार्श्वभूमीवर पवार कुटुंबीयांनी हा निर्णय घेतला आहे. राज्यातील जनतेने पाडव्याच्यादिवशी भेटीसाठी बारामतीत येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरवर्षी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या गोविंदबाग निवासस्थानी राज्यातून लोक पवार कुटुंबीयांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी करतात. यंदा करोनामुळे हा निर्णय झाला आहे. शुभेच्छा देण्यासाठी येणाऱ्या सहकाऱ्यांनी, हितचिंतक बंधू-भगिनींनी यंदा बारामतीला न येता आपापल्या घरूनच शुभेच्छा द्याव्यात. करोना प्रतिबंधक नियमांचे पालन करीत आपापल्या घरीच सुरक्षित दिवाळी साजरी करावी. करोनाला हरवल्यानंतर पुढची दिवाळी मात्र, पारंपरिक उत्साहात, जल्लोषात बारामतीला एकत्रित येऊन साजरी करूया, असे आवाहन पवार कुटुंबीयांनी केले आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार आणि पवार कुटुंबीयांच्या वतीने संयुक्त निवेदन प्रसिद्धीस देण्यात आले आहे.

Exit mobile version