Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

मराठा आरक्षण; पार्थ पुन्हा आजोबांच्या भूमिकेविरोधात?

Spread the love

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिली. त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला असून, दुसरीकडे आत्महत्यांचे सत्र सुरु झाले आहे. वैद्यकीय प्रवेशासाठी निवड होणार नसल्याचे लिहून निराश झालेल्या १८ वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. विवेक कल्याण रहाडे याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.अशा परिस्थित पार्थ पवार यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारच्या विरोधात आपली भूमिका मांडली आहे.

दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन छत्रपती राजे खासदारांनी केंद्र सरकारकडून आरक्षण मिळवून द्यावं असं वक्तव्य करताना आरक्षणासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचं म्हटलं होतं. मात्र पार्थ पवार यांनी शरद पवार यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. पार्थ पवार यांनी यासंदर्भात ट्वीट करून आपली भूमिका मांडली आहे.

जय हिंद जय महाराष्ट्र असे टीव्ट करत पार्थ पवार यांनी सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त करत इशारा दिला आहे. . याआधी राम मंदिर, जय श्रीराम नारा देताना पार्थ पवारांनी घेतलेल्या भूमिकानंतर शरद पवार यांनी टीका केली होती. मात्र पार्थ पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यामुळे कौटुंबिक वाद वाढला. आता पुन्हा एकदा पार्थ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आजोबांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आता शरद पवार कुठली प्रतिक्रिया देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

Exit mobile version