Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

पारा गाव दुसऱ्यांदा कंटेनमेंट झोनमध्ये!

 

उस्मानाबाद :
पारा (राहुल शेळके प्रतिनिधी ): वाशी तालुक्यातील पारा गाव हे दुसऱ्यांदा कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आहे आहे. सुरवातीला 12/09रोजी फक्त दोन कोरोना रुग्ण सापडले होते त्यामुळे फक्त एक गल्ली सील करण्यात आली होती .परंतु दोन दिवसांत अचानक रुग्ण संख्या एकूण 16 झाल्या मुळे प्रशासन खडबडून जागे झाले होते व सर्व शासकीय यंत्रणा कोरोना साखळी तोडण्यासाठी अहोरात्र मेहनत करून संपूर्ण पारा गाव 7 ऑक्टोबर पर्यंत कंटेनमेंट झोन म्हणून सील करण्यात आले होते.

संपूर्ण गावातील प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती चा सर्वे करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामपंचायत ने गावातील दोन्ही शाळेतील एकूण 20 शिक्षक, आशा कायकर्त्या, ग्रा प कर्मचारी याच्यां मार्फत घरातील प्रत्येकाची इंफ्रारेड थर्मामिटर आणि ऑक्सिमिटर ने तापमान आणि ऑक्सिजन पातळी तपासुन कोरोणा रुग्णाची शोध मोहीम राबवली होती. यामुळे पारा गावातील कोरोणा बऱ्याच प्रमाणात आटोक्यात आला होता. आज पर्यत पारा येथे 49 रुग्णाची नोदं झालेली आहे.सध्या 3 रुग्ण कोव्हीड सेटंरला उपचार घेत असुन 12रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत. परतुं 13/10रोजी अचानक प्रशासनाने 26/10पर्यंत दुसऱ्यांदा संपुर्ण पारा गाव कन्टेन्मेन्ट घोशीत केल्या मुळे व्यापारी वर्गात नाराजीचा सुर उमटत आहे.
प्रत्येकाने प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आरोग्य विभागाने आणि ग्रामपंचायत च्या वतीने केले आहे.
सतत च्या बंदमुळे व्यवसायावर विपरीत परिणाम होत असून बंद हा पर्याय नाही. योग्य ती खबरदारी घेत व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी :

रोहीत शेळके, व्यावसायिक पारा.

Exit mobile version