परवेज मुल्ला
उस्मानाबाद : कोरोणासारख्या जागतिक महामारी मध्ये सुद्धा समाजातील वंचित घटकांना पत्रकारांनी मदत करत सर्व समावेशक अडचणी सोडवण्याचे कार्य पत्रकारांनी केले व करत आहेत परंतु पत्रकार बांधवांना कोरोणा सारख्या महामारी मध्ये कसलेही सुरक्षा कवच नव्हते मात्र याची दखल घेत कळंब तालुक्यातील पत्रकारांना उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्या वतीने “कोरोणा रक्षक” विम्याचे कवच देण्यात आले
कळंब शिवसेना संपर्क कार्यालयात ०७/११/२०२० रोजी कोरोणा रक्षक विम्याचे कवच उस्मानाबाद जिल्ह्याचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील, राष्ट्रवादीचे नेते प्रताप पाटील तथा गट नेते शिवाजी कापसे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी यावेळी संभाजी ब्रिगेड चे संतोष शिंदे, सागर बाराते,भैय्या खंडागळे,सचिन काळे उपसरपंच अजित गुरव पत्रकार आदी उपस्थित होते.