परंडा | उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा उपजिल्हा रुग्णालयांमध्ये डॉक्टरांचा हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे परांडा तालुक्यातील कात्राबाद या गावांमधील 65 वर्षीय व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याकारणाने परांडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले होते परंतु उपजिल्हा रुग्णालयांमध्ये हलगर्जी आणि कामचुकार डॉक्टर यांच्यामुळे या पेशंटला कोरोणाच्या संशयित आजारामुळे मृत्यू झाल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात येत आहे अशीच एक घटना उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये याआदी घडले असून आरोग्यमंत्री व पालकमंत्री काय करतात असा सवाल दोन्ही पेशंटच्या नातेवाईकांनि तसेच परंडा तालुक्यातील जनतेने केला आहे.
रुग्णाची तब्येत खालावल्यामुळे परांडा रुग्णालयातून रुग्णाला बार्शीला घेऊन जाण्यात सांगण्यात आले होते त्यानंतर पेशंटच्या नातेवाईकांनी परांडा रुग्णालयातून 108 नंबरच्या ॲम्बुलन्स मागणी केली असता त्यांना परांडा रुग्णालयातून वाद-विवाद केल्यानंतर ॲम्बुलन्स देण्यात आली परंतु त्यामध्ये कोणते प्रकारचे डॉक्टर्स अधिकारी देण्यात आले नव्हते त्यामुळे अखेरीस परांडा बार्शी प्रवासादरम्यान पेशंटचा डॉक्टर आणि ऑक्सिजन अभावी मृत्यू झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे.
याप्रकरणी पेशंटच्या नातेवाईकांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना मागणी केली आहे की उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच उस्मानाबाद जिल्ह्याचे आरोग्य मंत्री परंडा उपजिल्हा रुग्णालयाचे अधिकारी यांची कसून चौकशी व्हावी व पेशंटच्या नातेवाईकांना या बद्दल संपूर्ण माहिती देण्यात यावी व यापुढे असा कोणाचा रुग्णाचा बळी जाण्याची अजून वाट न पाहता योग्य ती सोयी उपलब्ध करून देण्यात याव्यात अशी मागणी केली जात आहे.