पुणे | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभागातर्फे आज बालगंधर्व रंगमंदिर,शिवाजी नगर, पुणे येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टचे विशेष सहकार्य या कार्यास लाभले या ठिकाणी सर्व कलाकार व तंत्रज्ञांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत ८७ रक्तदात्यांनी केले रक्तदान.
कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ,माजी महापौर प्रशांत जगताप, प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील,प्रदेश समन्वयक संतोष साखरे, शिवशंभू चारीटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भूषण सुर्वे यांच्या हस्ते करण्यात आले.पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राज्यात होत असलेला रक्त तुटवडा भरून काढण्यासाठी जनतेस तसेच राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करा या संदर्भात राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या तर्फे अनेक जिल्ह्यांमध्ये रक्तदान शिबिरे घेण्यात चालू झाले आहे,याच अनुषंगाने आज रक्तदान शिबिर पुण्यात आयोजित करण्यात आले होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट व सांस्कृतिक विभागातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात या पद्धतीच्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येत असून नागपूर,विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग, ठाणे, नवी मुंबई आदी ठिकाणी घेण्यात आलेले आहेत.तसेच सर्व पदाधिकारी आणखीन राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये याच पद्धतीचे शिबिर आयोजित करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी यावेळी सांगितले. महाराष्ट्रात खूपच मोठ्या प्रमाणावर रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे या अनुषंगाने व कोरोना ची लस घेतल्यानंतर एक ते दीड महिना रक्तदान करता येत नाही या अनुषंगाने जास्तीत जास्त रक्ताचा तुटवडा भासू शकतो. तो तुटवडा भरून काढण्यासाठी विविध जिल्ह्यांमध्ये असे रक्तदान शिबिर घेण्याचे आयोजित केल्याचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी सांगितल आहे तसेच शिवशंभु चारिटेबल ट्रस्ट व अक्षय ब्लड बँकेचे आभार देखील त्यांनी यावेळी मानले.
यावेळी कार्यक्रमाचे आयोजन प्रदेश उपाध्यक्ष सिने अभिनेते सिद्धेश्वर झाडबुके,पुणे शहराध्यक्ष सिनेअभिनेते गिरीश परदेशी,प्रदेश सरचिटणीस वंदन नगरकर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ.प्रशांत गेडाम,प्रदेश प्रसिद्धीप्रमुख अमित कुचेकर यांनी केले होते.यावेळी सुप्रसिद्ध युट्युब क्रिएट रेखा कंगतानी संकेत शिंदे,धनंजय वाठरकर,शशी कोठावळे,मनोज माझीरे, अरुण गायकवाड,रोहित कांबळे,मंगेश मोरे,स्मिता मधुकर, बालगंधर्व परिवारातील सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.