Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

मंदिर बंद उघडले बार,उद्धवा धुंद तुझे सरकार,राज्यातील मंदिरे उघडण्याच्या मागणीसाठी भाजपचे ठिय्या आंदोलन

Spread the love

परवेज मुल्ला

उस्मानाबाद : संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकारने बार उघडले आहेत परंतु अनेक वेळा विनंती करूनही महाराष्ट्राची अस्मिता असलेली मंदिरे, प्रार्थनास्थळे उघडण्यास या सरकारने परवानगी दिलेली नाही.राज्यात बार सुरु आणि मंदिर बंद या काळ्या निर्णयाविरोधात आणि मंदिरे तातडीने उघडावीत या मागणीसाठी आज दि. १३ रोजी भारतीय जनता पार्टी कळंब तालुक्याच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले.

राज्यात मागील कित्येक महिने मंदिरे बंद असल्याने मंदिर परिसरातील सर्व लोकांच्या उपजीविकेचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण होत असून कोरोनामुळे अक्षरश: उपासमारीची वेळ आलेली आहे. इतर राज्यांमध्ये मंदिरे, प्रार्थनास्थळे चालू आहेत पण केवळ महाराष्ट्रामध्येच बंद का? यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारी निर्माण झाली असून लोकांच्या जीवनमरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतीय जनता पार्टी कळंब तालुका वतीने हनुमान मंदिर पुनर्वसन सावरगाव कळंब येथील मंदिरासमोर भाजपा तालुकाध्यक्ष अजित बप्पासाहेब पिंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे आंदोलन करण्यात आले.

याप्रसंगी अरुण चौधरी,शिवाजी बाराते,मिनाज शेख,संजय जाधवर,हरिभाऊ शिंदे,नारायण टेकाळे,माणिक बोंदर,शिवाजी गिड्डे,रामभाऊ अंबिरकर,नागजी घुले,बाळासाहेब पवार,आनंद बोराडे,शिवाजी शेंडगे,प्रशांत लोमटे,उत्तरेश्वर जाधव,प्रदीप फरताडे,राजेश टोपे,इम्रान मुल्ला,अशोक क्षीरसागर,सुजित लिमकर,गणेश त्रिवेदी,अब्दुल मुलानी,गोविंद चौधरी,धम्मा वाघमारे,सुमित बोरगे,आकाश पवार,बालाजी मडके,सतीश शिंदे,करण साळुंखे,आकाश जावळे,शुभम जावळे,राजपाल सर भोंडवे,गणेश जावळे,भैय्या जावळे पदाधिकारी,कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Exit mobile version