Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

नृसिंह हायस्कुलच्या 50 व्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त माजी विद्यार्थी सोशल फौंडेशन यांच्या माध्यमातून रक्तदान करून आगळावेगळा उपक्रम!

Spread the love

पिंपरी-चिंचवड | जुनी सांगवी येथील “नृसिंह हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या” सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त, नृसिंह हायस्कूल माजी विद्यार्थी सोशल फाऊंडेशन तर्फे रविवार, दि. १० ऑक्टोबर २१ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरास श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे अक्षय ब्लड बँक यांनी काम पाहिले. एकूण 50 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले.

शाळेचे प्राचार्य श्री. सोपान बनकर सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी उपप्राचार्य श्री. रमेश घुमटकर सर, पर्यवेक्षक श्री. अशोक संकपाळ सर, श्री. शरद ढोरे सर, प्रा. ॲड. नितीन कदम सर, श्री. सुहास तळेकर, श्री. मलकारी पुजारी सर आणि इतर शिक्षक उपस्थित होते. महाविद्यालयातील प्रा. क्षितिज कदम यांनी “आधी केले मग सांगितले” या उक्तीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील स्वतः रक्तदान करून रक्तदानाचे महत्त्व आणि आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवला. अशा स्तुत्य उपक्रमास विद्यालयाच्या वतीने अभिनंदन आणि भावी कार्यास शुभेछा देण्यात आल्या.

शिबिरात शैलेंद्र अरगुलवार, राहुल गोडसे, राजू लोखंडे, अतुल जगताप, निलेश मोरे, अभिजित कोरडे, संतोष ढाणे, लीना मरळ, अश्विनी मोरे, राहुल पाटील, गणेश उथळे, धनश्री लोखंडे, गौरी सोनार, संग्राम सावंत, तुषार जोशी, गणेश शितोळे, ज्योती शिंदे, अतुल जाधव इ. माजी विद्यार्थी सहभागी होते.

Exit mobile version