Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

निमगाव केतकीमध्ये नैसर्गिक आपत्ती आणि अतिक्रमण आपत्ती मुळे ओढ्याला पूर; ओढ्याच काय होणार?

Spread the love

प्रतिनिधी: परवेज मुल्ला
इंदापूर | इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी हे गाव व्यापारी वर्ग तसेच मुख्य व्यवसाय आणि इंदापूर तालुक्यातील मोठे गाव म्हणून ओळखले जाते परंतु काही दिवसांपूर्वी निमगाव केतकी गाव मध्ये ओढा होता तो आता नाही असे समजावे लागेल त्याचे कारणही तसेच आहे परंतु ते पाठीमागे करत नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित करत लोकांना दिशाभूल देण्याचे काम प्रशासनाने प्रतिनिधी करत असल्याचे निदर्शनास आले.

काल झालेल्या पावसामध्ये रस्त्याचे रूपांतर हे रस्त्यावरती मोठ्या ओढ्यामध्ये दिसून आले त्यामध्ये निमगाव केतकी मधील सर्वसामान्य नागरिकांच्या घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी तसेच त्यांच्या गाड्या वाहून गेलेल्या पाहायला मिळाल्या आणि त्याचे सकाळीच प्रशासन तसेच राज्यमंत्री माननीय दत्तात्रय भरणे तसेच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी स्वतः निमगाव केतकी गावाला भेट देऊन गावाची पाहणी करून पुढील मार्गासाठी रवाना झाले, परंतु जर हे असेच होत राहिले तर आम्ही सर्व सामान्य नागरिक कोणाकडे याची दाद मागू असे यावेळी निमगाव केतकीतील काही नागरिकांनी केला असता सर्वांनी प्रश्नाचे उत्तर द्यायचे टाळल्याचे दिसून आले. इंदापूर बारामती हा राज्यमार्ग परंतु या राज्य मार्गावरती एक मोठा ओढा हा प्रमुख्याने चांगल्या पद्धतीने होता असेच म्हणावे लागेल आता तो नाहीसा झाल्याचे काल झालेल्या पावसामध्ये समोर आले.

काल झालेल्या पावसामध्ये अक्षरशः सर्वसामान्य कुटुंबांना मोठी पैशाची झळ बसलेली दिसून आली, कोणी रडताना दिले, तर कोणी राज्यमंत्री भरणे यांना यातून काहीतरी मार्ग काढून संसार उभे करून घ्या अश्या विनवण्या करताना दिसत होते, परंतु याचे कोणतेही गांभीर्य बाकी लोकांना नसल्याचे स्पष्टपणे दिसून आले, परंतु हातावरचे पोट आणि व्यापारीवर्ग मात्र रडत रडत या सर्व गोष्टींना सामोरे जात असल्याचे पाहायला मिळाले.

Exit mobile version