Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

रुग्णवाहिकेची गरज ओळखून पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून व कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या सहकार्याने ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर नवीन सेवा सुरू!

इंदापूर | आज पुण्यामध्ये पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या माध्यमातून व कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठानच्या सहकार्याने ‘ना नफा ना तोटा’ या तत्वावर आज म्हणजेच  दि.१६ ऑक्टोबर पासून नागरिकांच्या सेवेसाठी रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत या रुग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला अशी माहिती प्रतिष्ठानच्या वतीने राहुल साबळे यांनी दिली.

आदरणीय राज्यमंत्री नामदार दत्तामामा भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली  कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांचे माध्यमातून पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या सहकार्यातून ना नफा ना तोटा या तत्वावर रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान यांचे वतीने मा. श्री. अनिकेत (नाना) भरणे यांनी दिली. या आधी ही श्री शिवशंभू चॅरिटेबल ट्रस्टच्या सोबत  कै. भगवानराव भरणे प्रतिष्ठान महाराष्ट्राला रक्ताची गरज असताना रक्तदान शिबिराचे रेकॉर्ड केले होते त्यामुळे या सर्व सामजिक कार्याचे तालुक्यातून सर्व स्तरातून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना आजारपणात ऐनवेळी मोठा आर्थिक फटका बसतो.अनेक वेळा रुग्णवाहिकेच्या जास्तीच्या भाड्यामुळे नाईलाजाने खाजगी वाहनाने रुग्णांची ने आण करावी लागते. ते तातडीच्या उपचारांच्या दृष्टीने रुग्णाच्या जिवीतासाठी नुकसानदायक ठरते.याचा विचार करुन प्रतिष्ठानच्या माध्यमातून ही सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे,असे यावेळी साबळे यांनी स्पष्ट केले.

Exit mobile version