Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

आर्सेनिक अल्बम गोळ्यावरून पेटले राजकारण; मंत्री हसन मुश्रीफ यांचे आव्हान!

Spread the love

कोल्हापूर | अर्सेनिक अल्बमच्या गोळ्या दोन रुपयांना मिळवून द्या; सर्व जिल्हा परिषदांना तुमच्याकडून गोळ्या घेतो,’ असे पत्र ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना गुरुवारी पाठविले. पाटील यांनी दोन रुपयांच्या गोळ्या २३ रुपयांना खरेदी केल्या जात असल्याबद्दल टीका केली होती. त्याला मुश्रीफ यांनी प्रत्युतर दिले. कोरोना रोखण्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने ‘अर्सेनिक अल्बम – ३०’ हे होमिओपॅथी औषध वापरण्याची शिफारस केली आहे.

कोरोना रोखण्यासाठी भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने ‘अर्सेनिक अल्बम – ३०’ हे होमिओपॅथी औषध वापरण्याची शिफारस केली आहे. राज्यात एकूण २७,८७७ ग्रामपंचायत असून ४४,१३७ गावे आहेत. त्यानुसार राज्यातील पाच कोटी ग्रामीण जनतेसाठी होमिओपॅथी औषध ‘अर्सेनिक अल्बम -३०’ मोफत देण्याची घोषणा केली. मात्र आपण चुकीच्या माहितीच्या आधारे जनतेची दिशाभूल करीत आहात, असे मुश्रीफ यांनी पत्रात म्हटले आहे.

Exit mobile version