Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

१ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दुध एल्गार आंदोलन; हर्षवर्धन पाटील!

Spread the love

इंदापूर | गायीच्या दुधाला सरसकट १०रू./ प्रति लिटर अनुदान व दुध पावडरला प्रति किलो ५० रू. अनुदानाच्या मागणी करीता १ऑगस्ट २०२० रोजी भाजपा, रयतकांती संघटना, शिवसंग्राम, रासप, रिपाई आ. महायुतीच्या राज्यव्यापी दुध एल्गार आंदोलनाचे निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे, त्याच निवेदनाची प्रत इंदापुर तहसीलदार सोनाली मेटकरी यांना देण्यात आले. या वेळी माजी मंत्री. श्री.हर्षवर्धन पाटील, शिवाजीराव मखरे, जिल्हा संघटक आरपीआय माऊली चवरे,भाजपा श्री. निलेश देवकर, रयत क्रांती श्री.संदिपान कडवळे अध्यक्ष, आर पी आय श्री. किरण गोफणे,रासप शकिलभाई सय्यद शहराध्यक्ष भाजपा इंदापुर उपस्थित होते.

 

महाराष्ट्रातील शेतक-यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस नाकारल्या जाणारा कर्ज पुरवठा, नकली सोयाबीन बियाणामुळे करावी लागलेली दुबार पेरणी, युरिया खताचा तुटवडा व नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकाचे झालेले नुकसान या विविध संकटामध्ये
शासनाकडून शेतक-यांना कोणताही दिलासा प्राप्त झाला नाही. या संकटाच्या काळामध्ये दुधाचे भाव कमी झाल्याने दुध उत्पादक शेतक-यांची अवस्था दयनीय झाली आहे.

महाराष्ट्रामध्ये १ कोटी ४० लाख लिटर गायीचे दुध उत्पादित होते त्यापैकी ३५ लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केल्या जाते. ९० लाख लिटर दुध खाजगीसंस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते. १५ लाख लिटर दुध शेतकरी स्वतः हॉटेल्स, ग्राहक यांना पुरवितो. शासकिय योजनेद्वारे फक्त १ लाख लिटर दुध खरेदी केले जाते. बॅकेकडून काळा बाजार, कोकणातील शेतक-यांचे वादळामुळे झालेले या कोरोनाच्या लॉकडाउनच्या काळात दुधाच्या विक्रीमध्ये ३० टक्केपर्यंत घट झाली. शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी घटली. आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दुध संघाकडून दुध १५ ते १६ रू. दराने खरेदी केली जात आहे.

त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुध्दा निघू शकत नाही. शासनाने १० लाख लिटर दुध २५ रू. प्रति लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती. परंतु प्रत्यक्षात ७ लाख लिटर दुध खरेदी केली जात आहे. काही ठराविक दुध संघाकडून शासन दुध विकत घेत आहे. इतर शेतक-यांना व टुध उत्पादकांना शासनाने वा- यावर सोडले आहे. गायीच्या दुधाला प्रति लिटर १० रू. अनुदान, दूध भुकटी करीता प्रति किलो ५० रू. अनुदान, शासनाकडून ३० रू. प्रति लिटरने दुधाची खरेदी या न्याय मागण्याकरिता आम्ही सर्व शेतकरी १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दुध एल्गार आंदोलन करीत आहोत या निवेदना सोबत गायीचे पवित्र दूध आपणास व आपल्या मंत्री मंडळातील सर्व सहका-यां करिता पाठवित आहोत. या पवित्र दुधाचे प्राषण करून आपण न्याय बुध्दीने वरील सर्व मागण्या मान्य कराल एवढीच अपेक्षा अशे निवेदनात म्हटले आहे

Exit mobile version