परवेज मुल्ला
उस्मानाबाद :
महाराष्ट्र शासनाच्या अर्थसंकल्प अधिवेशनात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळ तसेच संत रोहिदास चर्मकार महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या महामंडळास शासनाकडून अर्थसंकल्पात कसलीही तरतूद करण्यात आली नव्हती.या अनुषंगाने लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णूभाऊ कसबे तसेच प्रदेशाध्यक्ष सोमनाथ कांबळे यांच्या सुचनेनुसार राज्यभर महाराष्ट्र शासनाच्या विरोधात काळा कपडा डोक्याला बांधून निषेध आंदोलन करण्यात आले. या राज्यव्यापी आंदोलनाची दखल घेत अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल सभागृहात साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळासह संत रोहिदास चर्मकार महामंडळ, महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महामंडळास प्रत्येकी शंभर कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तसेच साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांचे मुंबई येथील राष्ट्रीय स्मारक व आद्यक्रांतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या पुण्यातील राष्ट्रीय स्मारकाच्या कामासाठी बैठक घेऊन ते वेगाने मार्गी लावण्याचे राज्य सरकारकडून आश्वासन देण्यात आले.
यावेळी राज्यसरकारच्या निर्णयाचे स्वागत करून उस्मानाबाद जिल्ह्य़ातील लहुजी शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी पेढे भरवून आनंद साजरा केला. यावेळी राज्यसरकारच्या निर्णयाचे स्वागत करून लहुजी शक्ती सेनेचे उस्मानाबाद जिल्हा कोअर कमेटी अध्यक्ष बालाजी गायकवाड तसेच कळंब तालुका अध्यक्ष पांडुरंग कदम,प्रसिद्धी प्रमुख विकास गायकवाड,युवक तालुकाध्यक्ष दिपक सहाने, तालुका उपाध्यक्ष सुदेश शिंदे, मोहन कसबे,शंकर ताटे, दिपक कसबे, खंडू ताटे,विठ्ठल ताटे, आदी कार्यकर्त्यांनी पेढे भरवून आनंद साजरा केला.