Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

आता एकनाथ शिंदे यांच्या नावापुढे पक्षप्रमुख पद लागणार का?

Spread the love

मुंबई | उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकारणीची बैठक पार पडली, या बैठकीमध्ये अनेक ठराव मांडण्यात आले.  ज्यामध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांच्या अभिनंदनाचा ठराव, जातीय जनगणना निर्णयाच्या अभिनंदनाचा ठराव,  मराठी अस्मितेबाबतचा ठराव, भारताची बाजू विदेशात भक्कमपने मांडण्याचा ठराव, पक्षांतर्गत निवडणुकांचा ठराव, निवडणूक जाहीर करण्याचा ठराव,  पक्ष गटाच्या पदाचे पदनाम बदलण्याचा ठराव मांडण्यात आला, तसेच पक्षाचे पुढचे अधिवेशन दिल्लीत घेण्यात यावे या संदर्भात देखील ठराव झाला, यावेळी एकनाथ शिंदे यांनी कार्यकारिणीला मार्गदर्शन केलं. एकनाथ शिंदे यांनी म्हटलं की, मला कोणतं पद द्यायचं यात पदाधिकाऱ्यांचं एकमत नाही. त्यामुळे आधी पदाधिकाऱ्यांनी एकमत करा, तोपर्यंत माझं मुख्य नेता हेच पद कायम राहील. पदाबाबत पुढच्या बैठकीत निर्णय घेऊ. कार्यकर्ता आणि लाडका भाऊ हेच पद माझ्यासाठी सर्वात मोठं आहे, पदं येतात जातात.  नाव जपलं पाहिजे, मी तेच जपतोय. शिवसेना ‘पक्षप्रमुख’ या पदासाठी बहुसंख्य पदाधिकाऱ्यांचा आग्रह आहे तर शिवसेना ‘राष्ट्रीयप्रमुख’ असं नाव द्यावं अशीही काही जणांची इच्छा, असल्याचं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

आमदार मंत्र्यांना कानपिचक्या 

दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी आमदार आणि मंत्र्यांना देखील कानपिचक्या दिल्याचं पाहायला मिळालं. कमी बोलू आणि जास्त काम करू तेवढं चांगलं, विरोधकांना एक्स्पोज करताना स्वतः एक्स्पोज होऊ नका . तुमचा चुकीचा शब्द पक्षाला अडचणीत आणतो. आपण एवढं मोठं यश मिळवलं ते चुकीचं बोलून घालवू नका. शिस्तीला तडा जाईल असं काही करू नका . केलेल्या कामांची ब्रेकिंग न्यूज व्हायला पाहिजे. जास्त ऐका कमी बोला, असं यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, मराठीची गळचेपी सहन करणार नाही. मराठी माणसाच्या उध्दारासाठी जे काही करायचं ते आपण करणार. दिलेला शब्द आपण पाळतो त्यामुळे मराठी माणूस आपल्यासोबत आहे. मुंबईबाहेर गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईत आणायचा प्रयत्न आपण करतोय. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय आपल्या सरकारच्या कार्यकाळात झालाय. मराठी भाषा भवन आपण तयार करतोय, असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

Exit mobile version