मुंबई | गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देऊन आज मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला संबोधण्यास सुरुवात केली त्यामध्ये महाराष्ट्रभर जे रुग्ण वाढत आहेतत्यांची चिंता व्यक्त केली, भयानक पद्धतीने रुग्ण वाढत आहेत, आणि आपल्या महाराष्ट्राला वाचविण्याचे आहे, आजच्या घडीला 1200 मेट्रिकटन ऑक्सिजन उपलब्ध करून दिल्याचे मा उद्धव ठाकरे यांनी सांगितले. रोज 2 लाख 25 हजार चाचण्या हिट आहेत. तरीही ऑक्सिजन वरॅमिडेसिव्ह इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवत आहे व आरोग्य यंत्रणेवर ताण येत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
यापूढे जे जे निर्बंध लागत आहेत ते आपल्या सर्वांसाठी आहेत, याचा मला आनंद होत नाही.
उद्या 8 पासून हे निर्बंध लागतील.!
•144 कलम उद्यापासून होणार चालू
•अन्वाश्यक सेवा बंद
•अत्यावशक्यक कामाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही.
•जनता कार्फ्या लागू
•सर्व आस्थापने सार्वजनिक सेवा बंद
•सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत अत्यावश्यकय सेवा चालू
•जीवनावश्यक सेवेमधील लोकांसाठी सार्वजनिक वाहतूक चालू.(लोकल, बस, हवाईवाहतूक)
•बँक, दूरसंचारकेंद्र व सरकारी कार्यालये चालू
•खाजगी वाहतूक पूर्णपणे बंद
•हॉटेल्स, रेस्टोरंटस बंद (पार्सल सेवा चालू)
•सकाळी 7 ते रात्री 8 रस्त्यांवरील खाद्यविक्रेत्यांना पार्सल साठी परवानगी.
महाविकास आघाडी सरकार काय देणार..?
•प्रतिव्यक्ती लाभार्त्याना 3 किलो गहू व 2 किलो तांदूळ मिळणार मोफत
•शिवभोजन थाळी मिळणार मोफत
•नोंदणीकृत बांधकाम कामगारांना मिळणार आर्थिक मदत
•अधिकृत फेरीवाल्यांना एकावेळी 1500 रू आर्थिक मदत
•परवानाधारक रिक्षाचालकांना एकावेळी 1500 रु आर्थिक मदत