इंदापूर | राज्याच्या सहकारात नावलौकिक असलेल्या व पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाच्या कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माघार घेतली असल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व त्यांचे मामा इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अप्पासाहेब जगदाळे या मामा – भाचे च्या नेतृत्वापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सपशेल माघार घेतली आहे. कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याच्या निवडणुकीत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा सहकारातील दांडगा अनुभव व सहकार वरील पकड पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील कार्यकर्ते व नेते बुचकळ्यात पडले असून कर्मयोगी कारखान्याची निवडणूक लढविणार नाही अशी घोषणा केली आहे.
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वरती सतत टीका करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्यातील नेत्यांनीच पहिल्यांदा निवडणुकीतून अंग काढले नंतर कार्यकर्त्यांना विचारणा करण्यात आली की तुम्ही निवडणूक लढविण्यास तयार आहात का त्यावेळी काही कार्यकर्ते म्हणाले की जर पहिल्या फळीतील नेत्यांना उमेदवारी दिली तर आम्ही ही निवडणूक लढू. परंतु पहिल्या फळीतील नेते निवडणूक लढविण्यास तयार नाहीत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इंदापूर तालुक्यात कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवार शोधूनही मिळत नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते हतबल झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गावोगावचे कार्यकर्ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, कृषी उत्पन्न बाजार समिती, खरेदी विक्री संघ इतर सहकारी संस्थाच्या निवडणुका लढविण्यास उत्सुक असतात नेतेही या निवडणुका लढविण्यास मोठ्या हिरीरीने भाग घेतात मग कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याची निवडणूक लढविण्यापासून दूर का पळत आहेत हा इंदापूर तालुक्यातील शेतकरी वर्गाला सर्वात मोठा प्रश्न आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची धास्ती..?
स्वर्गीय शंकरराव पाटील व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी व तालुक्यातील सामान्य नागरिकांपासून शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी इंदापूर तालुक्यात विविध सहकारी संस्था,कारखाने, बाजार समिती, शिक्षण संस्था उभ्या करून त्या सक्षम पणे चालवून नावलौकिक मिळवून दिले तसेच हजारो बेरोजगार तरुणांना नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या .
त्याउलट पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला इंदापूर तालुक्यात एकही संस्था आजपर्यंत उभा करता आली नाही त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना निवडणुकी संदर्भात विचारणा केली असता ते म्हणाले की कर्मयोगी कारखान्यावर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची सत्ता येणार असल्याने आम्ही निवडणूक लढवून “बळीचा बकरा का होऊ..” जर निवडणूक लढवायची असेल तर इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते लढवतील आम्ही त्यांच्या पाठीमागे आहोत. तर माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कडे कर्मयोगी शंकरराव पाटील साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी मागणाऱ्यांची मोठी गर्दी झाले आहे. कर्मयोगी ची निवडणूक लागल्याने गावातील पाटील समर्थक निवडणुकीची जोरदार तयारी करू लागले आहेत. कर्मयोगी ची निवडणूक लढविण्यास उत्सुक असलेल्या पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी गावातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. तर पुन्हा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचीच सत्ता येणार अशी शेतकऱ्यांमध्ये चर्चा पारावरती रंगल्या आहेत.