हिंदू पंचागानुसार, कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला धनत्रयोदशी (Dhantrayodashi 2021) अर्थात धनतेरस (Dhanteras 2021) साजरी केली जाते. यंदा 2 नोव्हेंबरला धनत्रयोदशी आहे. मान्यतेनुसार, या दिवशी भगवान धन्वंतरी ( Bhagwan Dhanvantari) प्रकट झाले होते. या दिवशी धनाची देवता कुबेराची (Kuber) पूजा केली जाते. खऱ्या अर्थाने या दिवसापासून दिवाळी सणाला (Diwali 2021) सुरुवात होते.Also Read – Maida Face Pack: दिवाळीपूर्वी चेहऱ्यावर येईल ग्लो आणि सॉफ्टनेस, त्यासाठी ट्राय करा मैद्याचे हे 3 फेसपॅक!
प्राचीन काळात देव आणि दानवांमध्ये युद्ध जुंपले होते. अमृतासाठी समुद्रमंथन करण्यात आले. तेव्हा भगवान धन्वंतरी ( Bhagwan Dhanvantari)अमृत कलश (Amrut Kalash) घेऊन प्रकट झाले होते. याच कारणामुळे धनत्रयोदशीला धन्वंतरी आणि औषधींचे पूजन (Dhanteras 2021 Puja Vidhi) केले जाते. पुराणांमध्ये धन्वंतरी देवाला भगवान विष्णूंचा अंशावतार मानले गेले आहे. चला तर जाणून घेऊ या भगवान धन्वंतरी पूजा विधी, मंत्र, शुभ मुहूर्त
भगवान धन्वंतरी पूजनाचा शुभ मुहूर्त…
सायंकाळी 5 ते 06 वाजून 30 मिनिटांपर्यंत. याशिवय 06 वाजून 45 मिनिटांपासून ते रात्री 08 वाजून 11 मिनिटांला शुभ मुहूर्त आहे.
भगवान धन्वंतरीच्या पूजेचा विधी…
धनतेरसच्या दिवशी भगवान धन्वंतरी प्रतिमा एका चौरंग किंवा पाटावर ठेवावी. आपण पूर्वेकडे मूख असलेल्या अवस्थेत बसावे. हाता तिनदा पाणी घेऊन आचमन करून भगवान धन्वंतरीला आवाहन करावे. अक्षता, पुष्प, जल, दक्षिणा, वस्त्र, कलावा, धूप आणि दीप अर्पण करावे. यानंतर नैवेद्य दाखवावा. भगवान धन्वंतरीच्या मंत्राचा जप करावा. नंतर आरती करून दीपदान करावे.
भगवान धन्वंतरीचे मंत्र
1. ॐ श्री धनवंतरै नम:
2. ॐ नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय धनवंतराये:,
अमृतकलश हस्ताय सर्वभय विनाशाय सर्वरोगनिवारणाय,
त्रिलोकपथाय त्रिलोकनाथाय श्री महाविष्णुस्वरूप,
श्री धन्वंतरि स्वरूप श्री श्री श्री अष्टचक्र नारायणाय नमः
3. ॐ शंखं चक्रं जलौकां दधदमृतघटं चारुदोर्भिश्चतुर्मिः,
सूक्ष्मस्वच्छातिहृद्यांशुक परिविलसन्मौलिमंभोजनेत्रम,
कालाम्भोदोज्ज्वलांगं कटितटविलसच्चारूपीतांबराढ्यम,
वन्दे धन्वंतरिं तं निखिलगदवनप्रौढदावाग्निलीलम.