दिल्ली | कोल्हापुरातील कामगारांसाठी असलेल्या(ESI) हॉस्पिटल मध्ये कॉरोना संबंधीच्या विविध सुविधा पुरवण्याकरिता केंद्रीय श्रम आणि कामगार कल्याण मंत्री संतोष कुमार गंगवार यांची छत्रपती संभाजीराजे यांनी दिल्ली मध्ये भेट घेतली. स्वतःच्या खासदार निधी मधून 22 लाखांचा निधी देण्याची तयारी त्यांनी दर्शवली. त्यावर मंत्री महोदयांनी तात्काळ अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून, आजच्या आज पुढील निर्णय होतील असे त्यांनी सांगितले. कोल्हापूर मध्ये कामगारांच्या साठी असलेल्या हॉस्पिटल मध्ये पायाभूत सुविधा असून सुद्धा, ते कार्यान्वित नाही. 500 बेड ची व्यवस्था आहे. सध्या तिथे बाह्यरुग्ण विभाग सूरु असून, सध्या बाह्य रुग्ण विभाग फक्त चालू असून आत्ता हे रुग्णालय कोरॉना रुग्णासाठी महापालिकेला हस्तांतरित केले आहे.
परंतु पुरेसे मनुष्य बळ व यंत्र सामुग्रीच्या अभावामुळे काहीच हालचाल नाही ही गोष्ट लक्षात घेऊन खासदार निधीतून २२ लाख निधी या कामी देण्याचे नियोजन केले आहे. असे छत्रपती संभाजीराजे यांच्याकडून सांगण्यात आले. काही उपकरणांची कमतरता असली तरी ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या उपकरणांच्या खरेदी करिता, माझ्या खासदार निधी मधून खर्च करण्यात यावा, तसे पत्र सुद्धा त्यांच्याकडे सुपूर्द केले. केंद्राच्या आखत्यारीतले हे एकमेव हॉस्पिटल कोल्हापुरात आहे. त्यामुळे केंद्रीय व कामगार कल्याण मंत्र्यांची दिल्ली मध्ये जाऊन भेट घेतली. व तसेच संपूर्ण स्थिती सांगितली.
यावर मंत्री महोदयांनी तात्काळ सर्व संबंधित अधिकाऱ्यांना आजच बैठकीकरिता बोलावले आहे. त्या हॉस्पिटल साठी अत्यावश्यक त्या सुविधा तात्काळ पुरवण्यात येतील आणि हॉस्पिटल कोरोना बाधित रुग्णांना खुले केले जाईल, असा शब्द त्यांनी दिला.