करमाळा | महाराष्ट्र राज्याचे गृह राज्य मंत्री शंभूराजे देसाई यांना युवा सेनेच्या वतीने खाजगी व बँकेकडून होणारी बळजबरीने होणारी कर्ज वसुली थांबवण्यासाठी निवेदन करमाळा येथे शासकीय विश्राम गृह येथे युवा सेनेच्या वतीने करमाळा तालूक्यात खाजगी, व बॅंका यांच्या वतीने कर्जाच्या हप्त्यासाठी तगादा लावत आहेत. व मानसीक त्रास देत आहेत. जवळ पास तीन ते चार महीने होत आले संपूर्ण लॉक डाऊन आहे. यामुळे सर्व काम धंदे बंद आहेत. व शासनाचा सुध्दा सक्त आदेश आहे की बळ जबरी व तगादा हप्त्यासाठी लाऊ नये . तरी पण काही शेतकऱ्याचे ट्रॅकटर लोन असुन त्या शेतकऱ्यांनी हप्ते न भरल्यास ट्रॅकटर ओढून नेण्याची भाषा केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेतरी आपण राज्याचे गृह राज्यमंत्री आहात.
शेतकऱ्यांची परिस्थितीची आपणास चांगली जाणीव असुन आपण बळजबरीने हप्ते घेणाऱ्या फायनान्स कंपन्याच्या मॅनेजर, व वसूली अधिकारी व ट्रॅकटर ,गाडी ओढणाऱ्या टीम वर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश द्यावेत, महिला बचत गटामध्ये सुध्दा अशीच बळजबरीने पठाणी वसूली चालू आहे. याकडे सुद्धा लक्ष देण्याची आहे. या मागणीचे निवेदन तसेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडु यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची राज्यसभेत घोषणा करण्यास विरोध केला त्याचा युवासेनेच्यावतीने जाहीर निषेध करण्यात आला असून याबाबत निषेधाचे निवेदन गृहराज्य मंत्री शंभुराजे देसाई यांना युवा सेनेच्यावतीने देण्यात आले आहे.
यावेळी मकाई कारखान्याचे चेअरमन दिग्वीजय बागल , जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे, युवा सेनेचे मा. ता .प्रमुख सचिन काळे, शिवसेना ता. संघटक संजय शिंदे, भरत अवताडे उप जिल्हा प्रमुख , सतीश बापू निळ शिवसेना नेते संतोष गाणबोटे, आदी मान्यवर व पदाधिकारी उपस्थीत होते .