कळंब तालुका पत्रकार संघाचे पुरस्कार जाहीर: संजय मिस्किन,वाघमारे,वेदपाठक, बर्दापूरकर, मातने यांना जाहीर!
परवेज मुल्ला
उस्मानाबाद | कळंब तालुका पत्रकार संघाच्या वतीने दरवर्षी पत्रकारिता व विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थाचे पुरस्कार पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर यांनी जाहीर केले.
कळंब तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ सदस्य माधवसिंग राजपुत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठक घेण्यात आली आहे.
यावेळी कै. स्वातंत्र्यसैनिक शिवशंकर (बप्पा) घोंगडे पत्रकारिता पुरस्कार संजय मिस्कीन, रा ई काकडे पत्रकारिता पुरस्कार प्रमोद वेदपाठक (परंडा), कै गणेश घोगरे पत्रकारिता पुरस्कार भिमाशंकर वाघमारे (उस्मानाबाद), कै सुधाकर सावळे पत्रकारिता पुरस्कार प्रशांत बर्दापूरकर (अंबाजोगाई), सोशल मीडिया वृत्तवाहिनी पुरस्कार राजकीय कट्टा चे संपादक प्रा. सतीश मातने (उस्मानाबाद), कै कला गौरव पुरस्कार राजकुमार कुंभार (शिराढोण), धडपड्या युवक पुरस्कार बाळासाहेब गंपू काळे (ईटकूर), आरोग्य सेवा पुरस्कार उपजिल्हा रुग्णालाय कळंब यांना जाहीर करण्यात आले आहेत.
यावेळी कळंब तालुका पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते. जानेवारी मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याचे अध्यक्ष परमेश्वर पालकर यांनी सांगितले.