Site icon MahaMetroNews Best News Website in Pune

जिजाऊ जयंती निमित्त पुणे येथील लालमहालात अभिवादन करून वाहिली जिजाऊ आणि डॉ. सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली!

Spread the love

पुणे | १२ जानेवारी राष्ट्रमाता माँ जिजाऊ साहेब यांच्या जयंती सोहळ्याच्या पूर्व संध्येला सातारा जिल्ह्यातील मूळचे कुमठे गावचे व सध्या कामानिमित्ताने भोसरी येथे असणारे गिर्यारोहक रोहित जाधव व आंबेगाव तालुक्यातील काठापूर बू.येथील मुद्रा अर्चना प्रशांत करंडे वय वर्षे साडेतीन हिने पुणे येथील लाल महालात राष्ट्रमाता जिजाऊ तसेच अनाथांची माय डॉ.सिंधुताई सपकाळ यांच्या पवित्र स्मृतीस पुष्प हार अर्पण करून आदरांजली वाहिली! शिव विचार कडाक्याच्या आवाजात ऐकवत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.मुद्रा ने आज पर्यंत १५ गडकिल्ले पाई सर केले. नेहमीच सामाजिक संदेश देण्यासाठी ती आई वडिलांसोबत गड किल्ले ऐतिहासिक स्थळांना भेटी देत असते. कळसूबाई शिखर सर केल्यानंतर तिला बाल शौर्य पुरस्कार तसेच शंभू गौरव पुरस्कार ,शिवकालीन चलन देऊन गौरविण्यात आले.

गिर्यारोहक रोहित जाधव यांनी या अगोदर जिजाऊ जयंती लिंगाणा या सुळक्यावर आणि नाशिक येथील नवरी सुळक्यावर साजरी केली आहे. सध्या कोविडची परिस्थिती असल्यामुळे यावर्षी गडकिल्ले बंद असल्याकारणाने पुणे येथील लाल महाल येथे राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांना विनम्र अभिवादन केले.*
महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्यात्या अर्चना भोर – करंडे यांनी देखील या वेळी राजमाता जिजाऊ आणि डॉ.सिंधुताई सपकाळ यांना श्रद्धांजली अर्पण केली.

आज घडीला सिंधुताई सपकाळ यांच्या कार्याला चिरकळासाठी आपण जिवंत ठेवायला हवे.जिजाऊ आणि माई यांचे कार्य अगणित महान आहे.आपण त्यांचे कार्य जिवंत ठेवून अविरत पणे त्यांचे अनुकरण करायला हवे.असे अर्चना भोर- करंडे यांनी सांगितले. या अनोख्या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्रातील प्रसिद्ध गिर्यारोहक रोहित जाधव, मुद्राचे बाबा प्रशांत करंडे,मामा मचींद्र शिर्के,महिला भगिनी देखील उपस्थित होत्या.

Exit mobile version